Rahul Gandhi in Karnatak: त्याच मैदानावरुन राहुल गांधी पुन्हा भाजपला भिडणार

कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराला वेग आला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

Rahul Gandhi Rally in Kolar : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराला वेग आला आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सक्रिय झाली आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या ९ एप्रिलला कोलार येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानतंर 11 एप्रिलला ते वायनाडलाही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Rahul Gandhi will be on an election tour of Karnataka, will hold a meeting in Kolar)

विशेष म्हणजे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्याच दिवशी राहुल गांधीदेखील कर्नाटकातील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्या दिवशी होणारी त्यांच्या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi
Sharad Pawar Nagpur News : नागपुरात पोहोचलेल्या पवारांनी घेतली गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबत ट्विटवर माहिती दिली आहे."कर्नाटक विधानसभा निवडणुकीनिमित्त ते राहुल गांधी ९ एप्रिलला कोलारमध्ये 'जय भारत' मेगा रॅलीला संबोधित करतील. 11 एप्रिल रोजी ते वायनाड दौऱ्यावर असतील. ते लोकांचा आवाज आहे, तुम्ही त्यांना कधीही गप्प करू शकत नाही. हा आवाज अधिक मोठा आणि मजबूत होईल.'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्याचवेळी, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल.भाजपकडून निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल,असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. तसेच, 2018 मध्ये जनतेने काँग्रेसला नाकारले होते आणि यावेळीही नाकारतील, असा टोलाही सिद्धरामय्या यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com