PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या राजा पटेरियाला होऊ शकते 'ही' शिक्षा, अजामीनपात्र कलमांतर्गत कारवाई!

PM Narendra Modi : एफआयआरमध्ये आयपीसीची अजामीनपात्र कलम 115 आणि 117 जोडण्यात आली.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हत्येबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया (Raja Pateriya) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी पहाटे ५.३० च्या सुमारास त्यांना मध्य प्रदेशमध्ये दामोह येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली आहे. मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपा पक्षामध्ये चांगलाच गदारोळ झाला आहे.

राजा पटेरिया काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले होते, "जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे. नरेंद्र मोदी निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आणतील. मोदी धर्म, जाती, भाषा या मुद्यांच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाचे भवितव्य धोक्यात आहे. देशाचे संविधान वाचवायचे असल्यास, मोदी यांच्या हत्या करण्यास तयार असले पाहिजे. हत्या म्हणजे, त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काम करा,” असं ते म्हणाले.

Narendra Modi
Nitesh Rane News: काही पोलिस अधिकाऱ्यांना वाटतंय की 'महाविकास'चे सरकार आहे...नितेश राणे

दरम्यान गुन्हा दाखल होताच पटेरियांनी स्पष्टीकरण देत ते म्हणाले होते, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा हत्‍या किंवा ह‍िंसेत विश्वास नाही. मला माझ्या वक्तव्यातून मोदींचा पराभव करावा लागेल, असं सांगायचं होतं." पटेरिया यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली.

माजी आमदार राज पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजप नेत्यांनी पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे देशभरातून काँग्रेस संपत चालली असल्याचे, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले. या वक्तव्याबाबत काँग्रेसने माफी मागावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Narendra Modi
Manish Sisodiya : ...तर परिणाम भोगावे लागतील; उपमुख्यमंत्री सिसोदियांना न्यायालयाने फटकारले!

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. शिवराज सिंह म्हणाले होते, “राजा पटेरिया यांनी केवळ वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही, तर हे एक षडयंत्र आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्याची हत्या करावी लागेल, अशा शब्दांचा वापर का? ते या वक्तव्यातून अगदी स्पष्टपणे लोकांना भडकावत आहेत. याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात, याचा कधी विचार केलाय का?” असे ते म्हणाले होते.

राजा पटेरिया यांच्या विरोधात पन्ना जिल्ह्यातील पवई पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५१, ५०४, ५०५ (१) (ब), ५०५ (१) (सी), ५०६, १५३ ब (१) (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये आयपीसीची कलम 115 आणि 117 जोडण्यात आली. मध्य प्रदेश पोलिसांचे निवृत्त डीएसपी राकेश तिवारी म्हणतात की, नंतर जोडलेली दोन्ही कलमे अजामीनपात्र आहेत. राजा पटेरिया यांच्या विरोधात पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1860 (IPC 1860) च्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कलमांतर्गत काय शिक्षा होऊ शकते?

IPC चे कलम -115: या कलमाखाली दोषी आढळल्यास, कोणत्याही प्रकारच्या तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांपर्यंत असू शकते. याशिवाय न्यायालय दोषींना दंड आकारून शिक्षा देऊ शकते.

IPC चे कलम-117: या कलमाखाली दोषी आढळल्यास तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. न्यायालय दंडही ठोठावू शकते. न्यायालय दोन्ही शिक्षा देऊ शकते.

IPC चे कलम 505 (1) (B) आणि 1 (C): हे कलम खोट्या बातम्या पसरवण्याबद्दल किंवा प्रकाशित करण्याबद्दल आहे, ज्यामुळे सार्वजनिक अशांतता निर्माण होऊ शकते आणि गुन्हेगारी वाढू शकते. गुन्हा सिद्ध झाल्यास दोषीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. दंडही होऊ शकतो.

IPC चे कलम 153 (B):हे कलम राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम करणारे भाषण देणे किंवा आरोप करणे यासाठी लागू केले आहे. हे कलम अजामीनपात्र आणि दखलपात्र आहे. यामध्ये दोषी आढळल्यास न्यायालय तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा देऊ शकते. सार्वजनिक प्रार्थनास्थळा नजीक हा गुन्हा केल्यास, शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढू शकते.

IPC चे कलम 506 : हे कलम गुन्हेगारी धमकी देण्याच्या आरोपाखाली लागू केले आहे. यामध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. न्यायालय दोषींना आर्थिक दंडही ठोठावू शकते. खून किंवा इतर कोणताही गंभीर गुन्हा करण्याची धमकी दिल्यास अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. फाशीची शिक्षा किंवा सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. विशेष म्हणजे यामध्ये अतिरिक्त साक्षीदाराची गरज नाही.

IPC चे कलम 451: या कलमांतर्गत दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

IPC चे कलम 504: सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या कलमात दोषी आढळल्यास, दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. दोषी आढळलेल्या व्यक्तीला न्यायालय दंडही करू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com