Rajasthan election News : राजस्थानमध्ये आज विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्राप्त माहितीनुसार 69 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. राजस्थानमध्ये मुख्य लढत ही सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्येच आहे. मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जनादेश आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणच्या तुरळक हिंसक घटना सोडल्या तर राज्यभरात मतदान शांततेत पार पडले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकूण 74.06 टक्के मतदान झाले होते.
मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 68.24 टक्के मतदान झाले होते. तेव्हा अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभा होते. सायंकाळी 6 वाजपेर्यंत मतदान पार पडले, त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चित वाढली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणूक आयोगानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान हे जैसलमेर जिल्ह्यात झाले होते. हनुमानगढ आणि धौलपूर जिल्हे दुसऱ्या स्थानावर होते. याशिवाय ज्या ठिकाणी हिंसक घटना घडल्या, तिथे पुन्हा मतदान घेण्याबाबतचा निर्णय पर्यवेक्षकांच्या रिपोर्टनंतर घेतला जाणार आहे.
तसेच त्यांनी हेही सांगितले की कुठेही मतदान प्रक्रिया थांबल्याची माहिती समोर आली नाही. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड जाणवला परंतु ही संख्या क्वचित होती.
सत्तारूढ काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी मतदान प्रक्रिया पार पडत असताना, माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्याच पक्षाला जनादेश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूरमध्ये सांगितले की, ''काँग्रेसविरोधात कोणतीही लाट नाही आणि पक्ष पुन्हा एकदा राजस्थानमध्ये सरकार स्थापन करेल. असं दिसतंय की कुणीतरी अंडरकरंट आहे, काँग्रेस पुन्हा सरकार बनवणार'' तर दुसरीकडे वसुंधरा राजे यांनी झालवाडा येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री गेहलोत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत प्रत्युत्तर दिले, ''वसुंधरा राजे म्हणाल्या मी त्यांच्या(गेहलोतांच्या) वक्तव्याशी सहमत आहे. खरंत एका धक्का बसणार आहे परंतु तो भाजपाच्या बाजूने असेल, 3 डिसेंबर रोजी रास्थानमध्ये कमळ फुलणार आहे.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.