Rajasthan Assembly Results 2023: मोदींची भविष्यवाणी खरी ठरली ! पुन्हा गेहलोत यांचे सरकार...

Narendra Modi ON Ashok Gehlot: सांगितले होते हव तर लिहून ठेवा.
Narendra Modi ON Ashok Gehlot
Narendra Modi ON Ashok GehlotSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Results 2023 News update: राजकारणात निवडणूक निकाल हा पुढील पाच वर्षांची वाटचाल ठरवत असला तरी काही नेत्यांसाठी तो आयुष्यभराची दिशा निश्चित करत असतो. काही नेत्यांचे जसे राजकीय करिअर सुरू होते तसेच अनेक नेत्यांच्या राजकीय करिअरचा शेवटसुद्धा होतो. म्हणूनच निवडणूक निकालासंदर्भात केल्या जाणाऱ्या भविष्यवाणीकडे प्रत्येकाचे लक्ष असते. त्यातही जेव्हा खुद्द देशाचे पंतप्रधान एखादी भविष्यवाणी करतात तेव्हा त्यास विशेष महत्त्व असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविषयी अशीच एक भविष्यवाणी केली होती, जी प्रत्यक्षात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

सत्तापालटाची राजस्थानची परंपरा

राजस्थान या राज्याच्या निवडणूक निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत दर पाच वर्षाला सत्ता पालट झाला आहे. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येईल असा ढोबळमानाने अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत हे जादूगार आहेत आणि त्यामुळे त्यांची जादू यशस्वी होऊन ही परंपरा मोडीत निघेल, असा ठाम विश्वास राजस्थानचे मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला होता.

.

काय होती पंतप्रधान मोदी यांची भविष्यवाणी ?

राजस्थानमधील डुंगरपूर येथील प्रचार सभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ही भूमी मावजी यांची तपस्या भूमी आहे. इथे केलेली भविष्यवाणी १०० टक्के सत्यात उतरते आणि म्हणून मी त्यांना वंदन करून अशी भविष्यवाणी करतो. राजस्थानमधील जनतेने लिहून घ्यावे, भविष्यात राजस्थानमध्ये पुन्हा कधीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार येणार नाही.

Narendra Modi ON Ashok Gehlot
Vasundhara Raje News: वसुंधरा राजे झालरापाटणमधून पाचव्यांदा विजयी...

कशी होणार खरी ?

राजस्थानातील जनतेने सध्या निवडून दिलेले सरकार २०२८ पर्यंत असणार आहे. राज्यातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून गेहलोत व सचिन पायलट यांच्यात सुप्त संघर्ष शिगेला पोचला होता. पुढील पाच वर्षांनंतर कॉंग्रेसमध्ये नवे नेतृत्व असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची फारच कमी शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांत कॉंग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे राज्यातील नेतृत्वाविषयी व एकूणच कार्यपद्धतीविषयी चिंतन होऊन मोठे फेरबदल होतील, अशी शक्यता आहे.

पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्याचे नेतृत्व युवा नेत्याकडे दिले जाऊ शकते. मध्य प्रदेश मधील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा मोठा भाजपमध्ये गेल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती सचिन पायलट यांच्याविषयी होऊ नये, याची खबरदारी पक्षाने घेतल्यास भविष्यात राजस्थानचे नेतृत्व सचिन पायलट यांच्याकडे जाऊ शकते. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भविष्यवाणी प्रत्यक्षात येत असल्याचे दिसून येत आहे.

Edited by: Mangesh Mahale

Narendra Modi ON Ashok Gehlot
Rajasthan Assembly Results 2023 : राजस्थानात काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना जनतेनं दाखवला घरचा रस्ता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com