Rajasthan Election : सचिन पायलट यांची कमाल; गेहलोत यांच्याशी भांडत वाढविले उत्पन्न

Sachin Pilot Income Increase : 2018 च्या तुलनेत 2023 ला त्यांच्या उत्पन्नातील रोख रकमेत सहा पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे.
sachin pilot : Ashok Gehlot News
sachin pilot : Ashok Gehlot NewsSarkarnama

Assembly Election : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राजस्थानातील (Rajasthan) टोंक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले असून, मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पायलट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गेल्या पाच वर्षांच्या काळात उत्पन्नात सहा पटीने वाढ झाली असल्याचे पुढे आले आहे. 2018 च्या तुलनेत 2023 ला त्यांच्या उत्पन्नातील रोख रकमेत सहा पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2018 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याकडे 6.43 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यामध्ये आता वाढ होऊन सुमारे 7.39 कोटी झाली आहे. सचिन पायलट यांच्याकडे 2018 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1.50 कोटी रुपयांची जंगम आणि 2.21 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. पत्नी सारा पायलटच्या नावावर 1.21 कोटी रुपयांची स्थावर आणि 1.33 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती, तर एका मुलाच्या नावावर 13,68,000 रुपये आणि दुसऱ्याच्या नावावर 2,59,000 रुपयांची जंगम मालमत्ता होती. अशा प्रकारे सचिन पायलट यांनी एकूण 2,99,75,000 रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली होती. त्याच वेळी, आता एकूण 3,43,64,000 रुपयांची स्थावर मालमत्ता घोषित केली.

sachin pilot : Ashok Gehlot News
Chhagan Bhujbal Bungalow Security : भुजबळांच्या बंगल्यावर शुकशुकाट; पण पोलिसांचा कडक पहारा

या वेळी पायलट यांनी 5.71 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.25 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर घोषित केली आहे. त्याचवेळी, एका मुलाच्या नावावर 20.18 लाख रुपये आणि दुसऱ्या मुलाच्या नावावर 6.34 लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. गतवेळेप्रमाणे यंदाही पुत्रांच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही. त्याचबरोबर पत्नीबाबत प्रतिज्ञापत्रात कोणताही उल्लेख नाही. अशाप्रकारे त्यांनी 5.98 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.41 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे.

भिवडीतील घराचा उल्लेख टाळला

पायलट यांनी 2018 च्या प्रतिज्ञापत्रात भिवडीमध्ये घर असल्याचा उल्लेख केला होता. त्या शपथपत्रात पायलट यांनी अरवली विहार, भिवडी येथे घर असल्याचे सांगितले होते. जे घर त्यांनी 2010 मध्ये 14.72 लाख रुपयांना खरेदी केले. त्यावेळी त्याची किंमत 19 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. या वेळी प्रतिज्ञापत्रात या घराचा उल्लेख नाही. या वेळी प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी जयपूरमध्ये 446.73 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट असल्याचे म्हटले आहे. जयपूरच्या मानसरोवर परिसरात असलेला हा फ्लॅट 2021 मध्ये 30 लाख रुपयांना खरेदी केला होता.

Edited by : Amol Jaybhaye

sachin pilot : Ashok Gehlot News
Murkute Vs Gadakh : ''गडाख यांचे 'हे' आंदोलन म्हणजे वराती मागून घोडे'' ; बाळासाहेब मुरकुटेंनी साधला निशाणा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com