Murkute Vs Gadakh : ''गडाख यांचे 'हे' आंदोलन म्हणजे वराती मागून घोडे'' ; बाळासाहेब मुरकुटेंनी साधला निशाणा!

Negar Politics : ''तालुक्यात आंदोलनाला बसण्याऐवजी...'' असा सल्लाही मुरकुटेंनी गडाख यांना दिला आहे.
Shankarrao Gadakh and Balasaheb Murukute
Shankarrao Gadakh and Balasaheb MurukuteSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे -

Murkute and Gadakh News : नगरचे पाणी जायकवाडीला सोडण्याच्या मुद्द्यावरून आता संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाला राजकीय धार येऊ लागली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख उद्या (ता. 2) जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

हे आंदोलन नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव (ता. नेवासे) येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टायमिंग साधत आमदार गडाखांच्या आंदोलनाविरोधात टीकेची आग ओकली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shankarrao Gadakh and Balasaheb Murukute
Chhagan Bhujbal Bungalow Security : भुजबळांच्या बंगल्यावर शुकशुकाट; पण पोलिसांचा कडक पहारा

जायकवाडीला दारणा, गंगापूर, भंडारदरा आणि मुळा धरणातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश झाला आहे, तर दुष्काळी परिस्थितीमुळे नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्यास विरोध होऊ लागला आहे. माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. पावसाच्या कालावधीत दोन महिने पाऊस झालाच नाही. यातून नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. नगरच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडू नये, यासाठी आमदार गडाख यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. यासाठी ते उद्या (ता. 2) घोडेगाव फाट्यावर शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करणार आहे.

Shankarrao Gadakh and Balasaheb Murukute
Shahaji Patil: माफी मागितल्यानंतरच शहाजी पाटलांची आंदोलकांनी सोडली वाट !

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आमदार गडाख यांच्या आंदोलनाच्या निर्णयावर टीकास्त्र सोडत म्हटले की, "आमदार गडाख यांचे हे आंदोलन म्हणजे वराती मागून घोडे, असे आहे. राजकीय फार्स आहे. २०२४ येत असल्याने यामागे राजकीय स्वार्थ लपलेला आहे. समन्यायी पाणीवाटप कायदा २००५ करणारेच आज पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत.''

याशिवाय ''समन्यायी कायदा मंजूर करतेवेळी यशवंतराव गडाख हे आमदार होते, हे शंकरराव विसरल्याचे दिसते की काय", असा टोला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी लगावला आहे. तसेच, गडाख यांनी तालुक्यात आंदोलनाला बसण्याऐवजी विधानभवनात जाऊन आंदोलन करावे, असाही सल्ला माजी आमदार मुरकुटे यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com