Rajasthan Politics : सचिन पायलटांसमोर काँग्रेसने ठेवली ऑफर्सची जंत्री?; धुडकावून लावत स्पष्ट केली भूमिका!

Sachin Pilot : दिल्लीच्या राजकारणात सारस्य नाही..
AshokGahlot Sachin Pilot
AshokGahlot Sachin PilotSarkarnama
Published on
Updated on

Rajsthan Politics : ऱाजस्थानातील राजकीय नाट्याला मोठे उधाण आले आहे. या वर्षाच्या अखेरीस राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. मात्र आतानिवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा गदारोळ सुरू झाला आहे. एकीकडे इतर सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यात गुंतले असताना, दुसरीकडे काँग्रेस आपल्या दोन बड्या नेत्यांमधील वाद मिटवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.

खरं तर यापूर्वीच काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले होते. काँग्रेसने पायलट यांच्या उपोषणाला पक्षविरोधी कृती म्हंटले आहे. असे असले तरी काँग्रेसकडून पायलट यांच्यावर, अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पायलटबाबत काँग्रेस काहीसा मवाळ भूमिकेत दिसत आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांच्यावरही पायलट यांचे मन परिवर्तन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून पायलट यांना अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत, मात्र पायलट यांना काय हवे आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील मतभेद जाहीर आहेत. 'आधीच्या भाजप सरकारमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई का झाली नाही?' या मुद्द्यांवर पायलट एकदिवसीय उपोषणाला बसले. संतप्त पायलट यांचे मन वळवण्यासाठी काँग्रेस पक्षाने कमलनाथ आणि केसी वेणुगोपाल यांना त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ आणि पायलट यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या संवादात कमलनाथ यांनी पायलटला अनेक ऑफर्स दिल्याचे, आता बोलले जात आहे.

AshokGahlot Sachin Pilot
Prakash Ambedkar News : राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्यास ॲड. प्रकाश आंबेडकरांना नामी संधी! पण...

पायलटला काँग्रेसची ऑफर :

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायलट यांना काँग्रेस कार्यकारिणीत समाविष्ट करण्याची ऑफर देण्यात आली होती. याशिवाय त्यांना स्क्रीनिंग कमिटीमध्ये समाविष्ट करण्याची ऑफरही काँग्रेसकडून देण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी गेहलोत-पायलट वादामुळे आपले नुकसान व्हावे, असे काँग्रेसला वाटत नाही.

यासाठी काँग्रेसने पायलट यांना दोन मोठ्या ऑफर दिल्या. राजस्थान निवडणुकीत तिकीट वाटपात मोठी भूमिका दिली जाईल, असे काँग्रेसने पायलट यांना सांगितल्याचे समजते. याशिवाय काँग्रेसकडूनही काही ऑफर्स देण्यात आली आहेत, ज्याला पायलटने यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

AshokGahlot Sachin Pilot
Amit Shaha In Mumbai : अमित शहा मुंबईत दाखल; महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन!

हेतू काय आहे?

काँग्रेसने पायलट यांना दिलेल्या अनेक ऑफरपैकी एक म्हणजे त्यांना दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरमोठे पद किंवा जबाबदारी दिली जाईल. मात्र ही ऑफर पायलट यांनी साफ नाकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी सांगितले की, आपल्याला राजस्थानचं राजकारण सोडून कुठेही जायचे नाही. अशा स्थितीत सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ऑफर्स मान्य नसल्याचं समजतं. याशिवाय त्यांनी पायलट यांना आपली ठाम भूमिकाही स्पष्ट केली. दिल्लीत राजकारणात आपल्याला स्वारस्य नसल्याचे, त्यांनी हायकमांडला सांगितले आहे.

खरे तर पायलट-गेहलोत वाद सोडवण्याची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ आणि पायलट यांच्यात झालेल्या बैठकीत पायलट म्हणाले की, 'पक्षात त्यांची प्रतिष्ठा बहाल केली पाहिजे'. या बैठकीत कमलनाथ यांनी पायलट यांना विचारले की, "त्यांचा आणि गेहलोतमधील वाद कसा मिटवता येईल?' यावेळी, पायलटच्या यांच्या उपोषणाला पक्षविरोधी कृती म्हंटले जात असल्याने, पायलट चांगलेच संतापले असल्याचेही सूत्रांकडून समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com