Ravi Shankar Prasad : 'महाकुंभ'मधील चेंगराचेंगरीमागे षडयंत्र? ; रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यामुळे खळबळ!

Ravi Shankar Prasad on Mahakumbh stampede : ...तपास पूर्ण झाल्यानंतर यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शरमेने मान खाली घालावी लागेल, असंही रविशंकर प्रसाद यांनी संसदेत म्हटले आहे.
Ravi Shankar Prasad
Ravi Shankar PrasadSarkarnama
Published on
Updated on

BJP MP Ravi Shankar Prasad News : भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी लोकसभेत प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचा उल्लेख केला आणि म्हटले की या चेंगराचेंगरीत षडयंत्राचा वास येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शरमेने मान खाली घालावी लागेल.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावरील चर्चेत भाग घेत, बिहारमधील पाटणा साहीबचे खासदार रविशंकर प्रसाद(Ravi Shankar Prasad) यांनी म्हटे की, आतापर्यंत 35 कोटी लोकांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले आहे. त्यांनी म्हटले की, महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास सुरू आहे. सत्य लवकरच समोर येईल.

Ravi Shankar Prasad
Delhi Election and Exit Poll : दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 'एक्झिट पोल'बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

तसेच रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना म्हटले की, कुंभ आणि सनातनचे नाव ऐकताच यांना त्रास का सुरू होतो? परंतु मी एक गोष्ट या सभागृहात स्पष्ट करू इच्छितो की, भारत सनातनचा अपमान सहन होणार नाही. हजारो वर्षांमध्ये तर कोणी सनातनला कमकुवत करू शकले नाहीत, तर ही लोकं कोण आहेत?

या दरम्यान प्रसाद यांनी राष्ट्रपीत मुर्मू(President Murmu) यांच्यावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, संविधान वाचवण्याचा दावा करणाऱ्यांनी सर्वोच्च घटनात्मक पदाचा सन्मान करणं शिकलं पाहीजे. तसेच त्यांनी हेही म्हटले की सर्वोच्च संविधानिक पदाचा अपमान करणं ही काँग्रेसची परंपरा आहे आणि त्यांच्या राजकारणाच्या डीएनएत आहे.

Ravi Shankar Prasad
Arvind Kejriwal News : केजरीवालांनी दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळणाऱ्या जागांचा थेट आकडाच सांगितला अन् म्हणाले...

याशिवाय त्यांनी हेही म्हटले की, काँग्रेसच्या(Congress) सरकारच्या काळात भारत पाच सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थांपैकी एक देश होता. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये भारताची अर्थव्यवस्था अतिशय बळकट झाली आहे आणि पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com