सुनबाई विरोधात सासरे मैदानात; जडेजाच्या वडीलांकडूनच कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन

रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिबावा जडेजा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
Gujrat Election 2022
Gujrat Election 2022

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी (२९ नोव्हेंबर) संपला. पहिल्या टप्प्यात अनेक हाय प्रोफाईल उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यापैकी एक म्हणजे क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा. रिबावा यांच्या जामनगर मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरात निवडणूकीत जडेजा कुटूंबातही मोठी फुट पडल्याचे दिसत आहे. एकीकडे रिबावा भाजपच्या तिकीटावर लढत असताना दुसरीकडे त्यांची नणंद नैना जडेजा या कॉंग्रेसच्या (Congress) स्टार प्रचारक म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या आहेत.

यात आता आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. नणंद भावजय यांच्यातील सामना रंगला असतानात आता या सामन्यात रवींद्र जडेया यांचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनीही उडी घेतली आहे. रवींद्र जडेजा यांचे वडिल अनिरुद्ध सिंह जडेजा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Gujrat Election 2022
Beautification of forts : प्रतापगड विकासाचा २०० कोटींचा आराखडा...

या व्हिडीओत ते आपली सुनबाई रिबावा जडेजा यांना मतदान करण्याऐवजी कॉंग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 'मी अनिरुद्ध सिंह जडेजा काँग्रेस उमेदवार बिपेंद्र सिंह जडेजा यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. तो माझ्या धाकट्या भावासारखा आहे. मी विशेषतः राजपूत मतदारांना भुपेंद्र सिंह यांना मतदान करावं,' असं आवाहन त्यांनी या व्हिडीओतून केले आहे.

दरम्यान, रवींद्र जडेजा यांची बहीण नैना जडेजा निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या आणि त्या काँग्रेस पॅनलच्या यादीत होत्या. पण भाजपने रिवाबा जडेजाच्या नावाची घोषणा केल्यावर काँग्रेसने नैना यांना डावलून बिपेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नैना यादेखील आक्रमकपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय गोंधळ सुरूच आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com