Modi government news : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी सोडलं पद; राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा

Ravneet Singh Bittu resignation, Union Minister : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रवनीत सिंग बिट्टू यांचा रेल्वे राज्यमंत्री पदाचा राजीनामा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी, मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण.
Dharmendra Pradhan
Dharmendra PradhanSarkarnama
Published on
Updated on

Union Council of Ministers update : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा, या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षही प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत. प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीसह विरोधकांनी घेतली आहे. या घडामोडी घडत असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे.

पंजाब भाजपचे नेते असलेले रवनीत सिंग बिट्टू यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही स्वीकारला आहे. बिट्टू यांच्या राजीनाम्याचे महत्वाचे कारणही समोर आले आहे. बिट्टू यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ जून महिन्यातच संपला आहे. त्यांना भाजपने पुन्हा राज्यसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिट्टू लढवू शकतात, अशी चर्चा आहे. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविले होते. त्यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपला.

Dharmendra Pradhan
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने मागील काही महिन्यांपासून पंजाबमध्ये ताकद वाढविण्यास सुरूवात केली आहे. आपच्या पंजाबमधील राज्यसभेच्या सहा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आणखी काही नेते भाजपच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. बिट्टू यांना पुन्हा राज्यसभेवर संधी न देता भाजपने त्यांच्यासाठी विधानसभेची वाट मोकळी केली आहे.

Dharmendra Pradhan
Jantar Mantar protest : अभिजीत दीपकेंसमोरच दिला पदाचा राजीनामा; पोलीस हवालदाराबाबत धक्कादायक माहिती आली समोर...

कुणाला मिळणार संधी?

मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची चर्चा सुरू आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होण्याची जोरदार चर्चा रंगली होती. बिट्टू यांच्या राजीनाम्यासह आणखी काही मंत्र्‍यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात काही जागा रिक्त आहेत. त्यावर नव्याने कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com