RBI on 2000 Note: मोदी सरकारची दुसरी नोटबंदी; दोन हजारांच्या नोटा बंद होणार!

RBI Big Announcement: दोन हजारांच्या नोटा कधीपर्यंत बदलता येणार?
RBI on 2000 Note:
RBI on 2000 Note:Sarkarnama

RBI News: दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या दोन हजारांच्या नोटा वापरता येणार आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

RBI on 2000 Note:
Nagpur Metro : मेट्रो स्टेशनसाठी खर्च झाले ४१ कोटी, पण पार्किंगसाठीचा खर्च बघाल, तर बसेल धक्का !

त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा वैध राहणार आहेत. 2018-19 मध्येच दोन हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती, असंही सांगण्यात येत होतं.

RBI on 2000 Note:
Sameer Wankhede News : वानखेडे भाजपचे कोण लागतात? आरएसएसच्या मुख्यालयात येऊन ते कोणाला भेटले? : पटोलेंचा सवाल

नोटा कधीपासून कधीपर्यंत बदलता येणार?

दरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 23 मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. यासाठी बँकेत एक वेगळी खिडकी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com