उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक नोंद ; भाजपने दिली एका महिलेकडे मोठी जबाबदारी

उत्तरांखडच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा एका महिलेची या पदावर निवड झाली आहे.
ritu khanduri
ritu khandurisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये (uttarakhand)भाजपने सत्ता स्थापन केली असून पुष्कर सिंह धामी हे (Pushkar Singh Dhami)दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. याबरोबर उत्तराखंडच्या राजकारणात पहिल्यांदाच एका महिलेची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री बीसी खंडुरी यांची कन्या ऋतु खंडूरी (ritu khanduri)यांची उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्याच्या पहिल्या महिला विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे. उत्तरांखडच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा एका महिलेची या पदावर निवड झाली आहे.

ritu khanduri
हिंसाचार प्रकरणी दिग्विजय सिंह यांना एक वर्षाची शिक्षा

उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कैाशिक म्हणाले, ''ऋतु खंडूरी यांची एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या राज्याच्या पाचव्या विधानसभा अध्यक्षा आहेत,''

2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांनी कोटद्वार येथून निवडणुक लढवली. त्यांनी कॉग्रेस सुरेंद्र नेगी यांचा पराभव केला. त्यांनी मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. पण विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

ritu khanduri
शिवसेनेचा न्यायव्यवस्थेवर हल्लाबोल ; दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू चोर बाजारातला..

कोण आहेत ऋतु खंडूरी

ऋतु खंडूरी या उत्तराखंडमधील पौड़ी गढ़वाल जिल्ह्यातील राधाबल्लभपुरम येथील रहिवाशी आहेत. ऋतु खंडूरी यांचा जन्म 29 जानेवारी 1965 रोजी एका लष्करी कुटुंबात झाला. त्याचे वडील भुवन चंद्र खंडूरी हे लष्करात होते. वडीलाच्या सतत होणाऱ्या बदलीमुळे त्याचे शिक्षण विविध ठिकाणी झाले. त्या पदवीधर असून त्यांनी पत्रकारितेची पदविका घेतली आहे.

त्याचे पति राजेश भूषण बेंजवाल हे बिहार कॅडरचे सनदी अधिकारी आहेत. सध्या ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य सचिव आहेत. ऋतु खंडूरी या समाजकार्यात सक्रीय आहेत. त्यांच्याजवळ 7.26 कोटी रुपयांची संपत्ति आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com