प्रदेशाध्यक्षांवर मोठी नामुष्की; पोटच्या मुलानेच धरला विरोधी पक्षाचा हात

RJD | JDU | Bihar Politics : मागच्या अनेक दिवसांपासून या गोष्टीची चर्चा होती.
lalu prasad yadav- Nitish kumar
lalu prasad yadav- Nitish kumar Sarkarnama
Published on
Updated on

पाटणा : बिहारमध्ये(Bihar) नितीशकुमारांचा जनता दल (संयुक्त) (JDU) पक्ष लालूप्रसाद यादव (Lalu prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (jagdanad SInh) यांचे धाकटे पुत्र अजित सिंह हे आता नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दलात प्रवेश करणार आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून या गोष्टीची चर्चा होती. पण आता खुद्द अजित सिंह यांनीच या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला.

अजित सिंह म्हणाले, माझ्यामते जनता दल हा एक समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे मला राष्ट्रीय जनता दलापेक्षा जनता दल (संयुक्त) मध्ये जास्त शिकायला मिळेल. जनता दलाचे प्रवक्ते अभिषेक झा यांनीही अजित सिंह यांच्या प्रवेशावर दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित सिंह हे १२ एप्रिल रोजी जनता दलाचे अध्यक्ष ललन सिंह यांच्या उपस्थितीमध्ये जनता दलात प्रवेश करणार आहेत.

lalu prasad yadav- Nitish kumar
कोल्हापुरात अशोक चव्हाणांनी घेतली नागेश पाटलांची भेट; २ वर्षांपूर्वीचा शब्द आठवणीने पाळला

लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आणि प्रदेशाध्यक्ष असलेले जगदानंद सिंह यांना चार मुले आहेत. दिवाकर सिंह, पुनीत कुमार, रामगढचे आमदार सुधाकर सिंह आणि सगळ्यात लहान इंजिनीअर अजित सिंह. अजित सिंह यांची सर्वात जास्त चर्चा झाली होती ती त्यांच्या अंतरजातीय विवाहानंतर. दरम्यान वडिल राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेते आणि भाऊ आमदार असूनही अजित सिंह यांच्या जनता दलात जाण्याने राष्ट्रीय जनता दल आणि लालू प्रसाद यादव, जगदानंद सिंह यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com