Lok Sabha Elections 2024 : सपा-रालोदचं ठरलं; किती जागा लढवणार? आकडाच सांगितला...

Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 : रालोद यूपीत 7 जागा लढवणार...
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : उत्तर प्रदेशातून मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रीय लोकदल (रालोद) इंडिया आघाडीमध्ये किती जागा लढवणार हे ठरवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष रालोदला 7 जागा देणार असल्याचे वृत्त आहे. रालोद यूपीमध्ये 7 जागा लढवणार आहे.

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात झालेल्या बैठकीनंतर रालोद यूपीत 7 जागा लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रालोदने एकूण ४०३ जागांपैकी ३३ जागा लढविल्या होत्या आणि २.८५ टक्के मतांसह ८ जागा जिंकण्यात यश मिळवले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखिलेश यादव यांनी शुक्रवारी एक ट्विट केले, ज्यात ते जयंत चौधरी यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांनी जागा जाहीर केल्या नाहीत, पण कॅप्शनमध्ये लिहिले की, राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पार्टी यांच्यातील युतीबद्दल सर्वांचे अभिनंदन. विजयासाठी आता सर्वांनी एकत्र यावे," असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

रालोदचे प्रवक्ते अनिल दुबे म्हणाले, "समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. रालोद पश्चिम उत्तर प्रदेशात सात जागा लढवणार आहेत."

समाजवादी पार्टी संभ्रमावस्थेत

यूपीमध्ये सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशात काँग्रेसने २५ जागांची मागणी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसच्या या मागणीमुळे समाजवादी पार्टी संभ्रमावस्थेत आहे. दुसरीकडे भाजपने यूपीत लोकसभेच्या जवळपास ८० जागांवर दावा केला आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणताही पक्ष आपले खाते उघडणार नाही, असा विश्वास भाजपला आहे.

R...

Lok Sabha Elections 2024
Santosh Bangar : वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदे गटातील आमदार पुन्हा चर्चेत; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com