नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत संपूर्ण देशभरात फटाक्यांना बंदी घालण्याच्या विरोधात राष्ट्रीय संघाने भूमिका घेतली आहे. संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने भारतात बनविलेल्या फटाक्यांवर बंदी न घालण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. याचवेळी मंचाने चिनी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी पुढे रेटली आहे. भारतात बनणारे आणि विशेषतः हरित फटाके सरसकट बंद करणे योग्य नसल्याचे मंचाने म्हटले आहे.
स्वदेशी जागरण मंचाने म्हटले आहे की, भारतात बनविलेल्या फटाक्यांत पोटॅशियम नायट्रेट, सल्फर यासारखी रसायने मिसळली जात नाहीत. राष्ट्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (एनईईआरआय) परवानगीनंतरच भारतीय फटाके बाजारात येतात. त्यापासून किमान 30 टक्के कमी प्रदूषण होते. त्यामुळे भारत सरकारने चिनी फटाक्यांवर बंदी जरूर घालावी मात्र भारतीय फटाक्यांना परवानगी द्यावी. हरित फटाक्यांबाबत राष्ट्रीय हरित लवादानेही मतप्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे.
दरवर्षी दिवाळीत चीनमधून प्रचंड संख्येने फटाके आयात होतात. हे चिनी फटाकेच सर्वाधिक प्रदूषणास कारणीभूत ठरतात. कारण त्या फटाक्यांमध्ये घातक रसायने मिसळलेली असतात. पोटॅशियम नायट्रेट, सल्फर, अॅल्युमिनियम, लिथियम, आर्सेनिक व मर्क्युरी यासारखी रसायने चिनी फटाक्यांत सर्रास मिसळलेली असतात. त्यातून निघणारा धूर घातक प्रदूषण करतो, असे मंचाने स्पष्ट केले आहे.
फटाक्यांमुळे सरसकट सगळ्या देशभरात प्रदूषणात वाढ होते याबाबतचा कोणताही अहवाल नाही. तसेच, त्याबाबतची वस्तुनिष्ठ माहितीही उपलब्ध नाही. देशातील हजारो कामगारांच्या हाताल काम देणाऱ्या फटाके उद्योगावर बंदीमुळे संक्रांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात फटाकेबंदी करू नये. शिवकाशी -तमिळनाडू व पश्चिम बंगालसह देशाच्या अनेक भागांत फटाके निर्मितीचा व्यवसाय आहे. त्यात हजारो लोकांचे रोजगार आहेत. फटाक्यांवर सरसकट बंदी घातल्यास त्यांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे मंचाने नमूद केले आहे.
Edited by Sanjay Jadhav
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.