Mohan Bhagwat: IBच्या अर्लटनंतर RSS प्रमुख मोहन भागवत यांची अशी असेल सुरक्षा

RSS Chief Mohan Bhagwat Secruity: मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या ठिकाणी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहे.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखीच सुरक्षा देण्यात आली आहे.

इंटेलिजेंस ब्यूरो (IB)ने याबाबत दिलेल्या सूचनेनुसार मोदी सरकारने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ही सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखी Advanced Security Liason (ASL) सुरक्षा असेल.

डॉ. मोहन भागवत यांना सध्या सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेत वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलिस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असेल.

Mohan Bhagwat
Shivaji Maharaj Statue: पुतळ्याचा बांधकाम सल्लागार पोलिसांच्या हातून निसटला कसा? पाठीशी कोण?

कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या ठिकाणी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहे. 58 कमांडो सुरक्षा व्यवस्थेत असतील.

काही मुस्लिम संघटनांच्या निशाणावर मोहन भागवत असल्याचे बोलले जाते. ASL अंतर्गत त्या व्यक्तीच्या संरक्षणाशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य आणि इतर विभाग यासारख्या स्थानिक संस्थांचा सहभाग आवश्यक असतो. त्यांच्या प्रवासासाठी खास डिझाइन केलेले हेलिकॉप्टर असते.

राजकारणी, हाय-प्रोफाइल सेलिब्रिटी आणि खेळाडूंना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांच्या व्यतिरिक्त सुरक्षा पुरवली जाते. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी एनएसजीचा वापर केला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com