शरण येण्याचा प्रस्ताव युक्रेननं धुडकावताच रशियाकडून विध्वंस सुरू

शरण येण्याचा रशियाचा प्रस्ताव मरिऊपोलमधील युक्रेनी सैनिकांनी फेटाळला आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine War Sarkarnama
Published on
Updated on

किव्ह : पश्‍चिम युक्रेनमधील लव्हिव शहरावर रशियाने (Russia) आज क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात 6 जण ठार व ११ जण जखमी झाले. रशिया-युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine War) आज 54वा दिवस आहे. रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील (Ukraine) शहरांवरील हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. लव्हिव शहरावर पाच शक्तिशाली क्षेपणास्त्रे डागण्यात आली. याचवेळी शरण येण्याचा रशियाचा प्रस्ताव मरिऊपोलमधील युक्रेनी सैनिकांनी फेटाळला आहे.

खारकिव्ह शहरात गोळीबारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गोळाबारात 13 जण जखमी झाले आहेत. मायकेलाइव्हतील ओडेसा बंदराजवळ रशियाचे रॉकेट हल्ले सुरूच आहेत. या युद्धात लव्हिवमध्ये आतापर्यंत सर्वांत कमी हानी झाली आहे. हे शहर तुलनेने सुरक्षित शहर मानले जात होते, पण त्यावरही रशियाने हल्ले सुरू केले आहेत. शहरावर पाच क्षेपणास्‍त्र डागल्याची माहिती लव्हिवचे महापौर आंद्रे सादोव्ही यांनी दिली.

Russia Ukraine War
पाकिस्ताननं काढली तालिबानची खोड! अफगाणिस्तानवर थेट हवाई हल्ले

युक्रेनमध्ये अनेक भागात रशियाचे क्षेपणास्त्र व रॉकेटचे हल्ले सुरूच आहेत. रशियाने ताबा मिळवलेल्या भागात रशियाच्या सैनिकांकडून नागरिकांचा छळ सुरू असल्याचे समोर येत आहे. याचबरोबर अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत. पूर्व डोनबास प्रांत बेचिराख करण्याचा रशियाचा डाव असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे.पूर्व युक्रेनच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे झेलेन्स्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे.

Russia Ukraine War
इंधन दरवाढीच्या झळा; देशात सर्वांत महाग पेट्रोल महाराष्ट्रात तर स्वस्त पोर्ट ब्लेअरमध्ये!

मारिउपोलप्रमाणेच दोन्स्तक आणि लुहान्स्कमधूनही नागरिकांना हटविण्याचे काम रशियाचे सैन्य करत आहे. शस्त्रे खाली ठेवून शरण आल्यास जीवदान देऊ, असे आवाहन रशियाने मारिउपोलमधील युक्रेनी सैनिकांना केले होते. त्यांनी हे आवाहन धुडकावून लावले आहे. रशियाच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मारिउपोलमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ, असा निर्धार युक्रेनचे पंतप्रधान डेनिस स्मिहल यांनी व्यक्त केला आहे. राजनैतिक पातळीवर या युद्धाचा शेवट करण्यास युक्रेन तयार आहे, पण कोणत्याही स्थितीत शरणागती पत्‍करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com