पुतीन यांच्याशी मोदी बोलले अन् काही तासांतच रशियाचा प्लॅन ठरला!

भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरीक व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
Vladimir Putin and Narendra Modi
Vladimir Putin and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

मॉस्को : रशियाचा (Russia) युक्रेनवरील हल्ला सलग नवव्या दिवशीही कायम आहे. त्यामुळे भारताकडून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेले भारतीय नागरीक व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच रशियातून मोठी बातमी आली आहे. भारतीयांसह इतर देशांतील नागरिकांना युक्रेनमधील खारकीव व सुमी शहरातून बाहेर काढण्यासाठी रशियाने 130 बस पाठवण्याची तयारी केली आहे. (Russia Ukraine War)

रशियन लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी आतापर्यंत दोनवेळा दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी रशियाने सहकार्य करण्याची विनंती पंतप्रधानांनी पुतीन यांना केली होती. त्यानुसार रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यापार्श्वभूमीवर रशियाकडून घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Vladimir Putin and Narendra Modi
युक्रेनमध्ये शिकणारी विद्यार्थिनी निघाली गावची सरपंच; जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू

युक्रेनमध्ये सध्या सुमारे आठ हजार भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. खारकीव व सुमी शहरांमध्ये अडकलेले भारतीय नागरिक व इतर देशातील नागरिकांना 130 बसद्वारे युक्रेनमधून बाहेर पाठवण्याची तयारी रशियाने दर्शवली आहे. या बस सज्ज ठेवण्यात आल्या असून युक्रेनमधील स्थानिक वेळापत्रकानुसार सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांना हलवण्यास सुरूवात केली जाणार आहे.

रशियाकडून संबंधित नागरिकांसाठी जेवण, वैद्यकीय सुविधा तसेच इतर सुविधा पुरवल्या जाणार असल्याची महिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी रशियाकडून लष्करी विमानांचीही व्यवस्था केली जाऊ शकते. बुधवारी पुतीन व मोदी यांच्यात झालेल्या संवादामध्ये पुतीन यांनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सर्वप्रकारची मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, गुरूवारी माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांच्याशी संवाद शादला आहे. आपण युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी विविध पातळ्यांवर संपर्कात आहोत. सुमारे 20 हजार भारतीयांना नोंदण केली होती. पण अनेकांनी नोंदणी केलेली नाही. खारकीवमध्ये अनेक जण अडकलेले असू शकतात, असा अंदाज आहे. दुतावासाने आवाहन केल्यानंतर अनेकांनी खारकीव सोडलं आहे. सुमारे 18 हजार भारतीयांना पहिल्या आवाहनानंतर युक्रेन सोडलं आहे. आतापर्यंत 30 विमानांद्वारे 6 हजार 400 जणांना भारतात आणले आहे. पुढील चोवीस तासात 18 विमानांचे उड्डाण होईल, असं बागची यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com