Rajsthan Politics: काँग्रेसचे ग्रहण सुटेना; आता सचिन पायलटही वेगळ्या वाटेवर?

Congress News| सचिन पायलट यांनी उपोषण केले पण त्यांच्या उपोषणात काँग्रेसचे नामोनिशाणही नव्हते
Rajasthan Politics
Rajasthan PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Congress News काँग्रेस (Congress) नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मंगळवारी (11 एप्रिल) आपल्याच सरकारकडून झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याची मागणी करत एक दिवसीय उपोषण केले. पण आता त्यांच्या या आंदोलनामुळे वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. सचिन पायलट दुसऱ्या मार्गावर आहेत की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. (National Political news)

काँग्रेसच्या राज्य युनिटने त्यांचे हे आंदोलन पक्षाच्या हिताच्या विरोधात असल्याचे आधीच सांगितले होते. पण तरीही त्यांनी हे उपोषण केल्याचे सांगितले जात आहे. एवढचं नाही तर पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्याशी अंतर्गत वाद सोडवावेत, असा कडक संदेशही हायकमांडने पायलट (Sachin Pilot) यांना दिला होता.पण तरीही पायलट उपोषणावर ठाम राहिले.

Rajasthan Politics
Karnataka Elections : भाजपकडून ५२ नव्या चेहऱ्यांना संधी ; नऊ डॉक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात..

सचिन पायलट (Sachin जयपूरच्या शहीद स्थळाच्या ठिकाणी उपोषण करत होते. पण तिथे पक्षाचे नाव किंवा चिन्ह किंवा पोस्टर्स यापैकी काहीही दिसत नव्हते. त्यामुळे सचिन पायलट आता वेगळ्या विचारात आहेत की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

सचिन पायलट यांच्या उपोषणाच्या स्टेजच्या मागे एक मोठा बॅनर होता. ज्यावर फक्त महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांचा फोटो होता. पण सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार आंदोलनस्थळी पोहोचला नाही. मात्र, त्यांचे समर्थक व इतर नेते मोठ्या संख्येने पोहोचले. यामध्ये माजी आमदार संतोष सहारन आणि रामनारायण गुर्जर यांचा समावेश होता.

Rajasthan Politics
Pune News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशांत जगतापांचे नाव फायनल? जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

विशेष म्हणजे दिवसभराच्या या उपोषणादरम्यान पायलट यांचा एकही समर्थकाकडेही काँग्रेसचा झेंडा किंवा चिन्ह दिसले नाही. पायलटच्या या भूमिकेमुळेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नव्या वाटेवर जाणार की काय अशी अटकळ जोर धरू लागली आहे. तसेच पायलटने काँग्रेस सोडल्यास त्यांचे पुढचे पाऊल काय असेल? अशाही चर्चा सुरु आहेत.

याशिवाय या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानमधील नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी पक्षावर दबाव आणण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून सचिन पायलट यांच्या उपोषणाकडे पाहिले जात आहे. सचिन पायलट यांनी याआधीही असा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना अशोक गेहलोत यांच्यासमोर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com