सुवर्ण मंदिरात राहुल गांधींचा खिसा कापला? हरसिमरत कौर यांनी उडवून दिली खळबळ

हरसिमरत कौर बादल यांनी 'सुवर्ण मंदिरात राहुल गांधी यांचा खिसा कुणी कापला,' असा सवाल उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे.
Rahul Gandhi, Harsimrat Kaur Badal
Rahul Gandhi, Harsimrat Kaur BadalSarkarnama

अमृतसर : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीची (Punjab Election 2022) रणधुमाळी सुरू असून राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही शनिवारी पंजाबचा दौरा करत काही धार्मिक स्थळांना उमेदवारांसह भेटी दिल्या. तसेच व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मतदारांशीही संवाद साधला. पण सुवर्ण मंदिरामध्ये राहुल गांधी यांचा खिसा कापल्याचा आरोप करण्यात आल्याने वादा निर्माण झाला आहे. (Punjab Election Update)

माजी केंद्रीय मंत्री व शिरोमणी अकाली दलाच्या (SAD) खासदार हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) यांनी 'सुवर्ण मंदिरात राहुल गांधी यांचा खिसा कुणी कापला,' असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. सुवर्ण मंदिरात राहुल गांधी यांच्यासोबत मुख्मयंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi), उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa), प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) हेही उपस्थित होते.

Rahul Gandhi, Harsimrat Kaur Badal
सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांचा थेट राऊतांना फोन!

कौर यांनी या तिघांचीही नावे घेत हा प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 'श्री हरमंदिर साहिबमध्ये राहुल गांधी यांचा खिसा कुणी कापला? चन्नी, सिध्दू की रंधावा? हे तिघांनाच झेड सुरक्षेमुळे राहुल गांधींजवळ जाण्याची परवानगी होती. बदनामीच्या घटनानंतर आमच्या पवित्र धर्मस्थळाचे नाव बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का?,' असं कौर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कौर यांनी या कथित घटनेबाबत अधिक माहिती दिलेली नाही. काँग्रेसने (Congress) या आरोपांवरून कौर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी ट्विट करत हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. 'हरसिमरत जी, असं काही झालेलंच नाही तर मग खोट्या बातम्या पसरवणे हे पवित्र गुरूंची बदनामी आहे. निवडणुकीतील विरोध चालेल पण तुम्हाला जबाबदारी आणि परिपक्तता दाखवायला हवी. हो, मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये बसून काळ्या कायद्यांवर मोहोर लावणे हे मेहनती शेतकऱ्यांचा खिसा कापण्यासारखे जरूर आहे,' असा टोला सुरजेवाला यांनी लगावला आहे.

डिसेंबर 2020 मध्ये तीन कृषी कायद्यांना विरोध करत हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन पंजाब निवडणूक प्रचाराचा प्रारंभ केला. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी निवडणूक प्रचाराची सुरूवात केली. सुवर्ण मंदिरानंतर दुर्गियाना मंदिर आणि भगवान वाल्मिकी मंदिरातही त्यांना माथा टेकला. त्यानंतर व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी मतदारांशी संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com