Sahitya Akademi : अकादमीच्या अध्यक्षपदी मराठी माणसाची निवड पुन्हा हुकली; पठारेंना अवघी ३ मते, हिंदीचे कौशिक विजयी!

Vishwas Patil : अकादमीच्या मंडळ सदस्यावर विश्वास पाटलांची निवड
Vishwas Patil
Vishwas PatilSarkarnama
Published on
Updated on

Sahitya Akademi : साहित्य क्षेत्रातली सर्वोच्च संस्था म्हणून गणली जाणारी साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदावर सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी तीन साहित्यिकांमध्ये लढत झाली. या लढतीत मराठी प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा पराभव झाला आहे. तर कन्नड साहित्यिक डॉ. मल्लापुरम व्यंकटेश यांचा पराभव झाला आहे. पठारेंच्या पराभवामुळे अकादमीच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यिक विराजमान होण्याची संधी पुन्हा हुकली आहे.

अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेवरील सदस्यांनी या तिरंगी लढतीच्या निवडणुकीसाठी मतदान केले. एकूण मतदानापैकी सर्वात जास्त मते कौशिक यांना मिळाली. कौशिक यांना ६० मते मिळाली. तर कन्नड साहित्यिक डॉ. मल्लापुरम व्यंकटेश यांना ३५ मते मिळाली. तर मराठी साहित्यिक पठारे यांना केवळ ३ मते मिळाली.

Vishwas Patil
Maharashtra Politics : रामदास आठवलेंच्या एका वाक्याने शिंदे गटाचे खासदार लोखडेंचं टेन्शन वाढलं

नवनिर्वाचित अध्यक्ष माधव कौशिक यांनी आता मावळते अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्याकडून अकादमीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकार करतील. अकादमीच्या उपाध्यक्षपदी प्रा. कुमुद शर्मा यांची निवड करण्यात आली. त्यांनी सी. राधाकृष्णन यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, प्रा. शर्मा यांच्या निवडीमुळे अकादमीच्या इतिहासात प्रथमच उपाध्यक्षपदी एका महिलेला संधी मिळाली आहे.

कार्यकारी मंडळाची निवड :

साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाची निवडही यावेळी करण्यात आली. कार्यकारी मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह २४ भारतीय भाषांचे प्रतिनिधी व केंद्र सरकार नियुक्त प्रतिनिधींचा समावेश असतो. यंदा मराठी भाषेचे निमंत्रक म्हणून प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, लेखक नरेंद्र पाठक यांची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली.

Vishwas Patil
Nagpur RTO : नागपूरमध्ये आरटीओ अधिकारी बदल्यांचे रॅकेट? पंचतारांकित हॉटेलमध्ये काय शिजलं?

मराठीतले साहित्यिक विश्वास पाटील यांची अकादमीच्या मंडळावर निवड :

मराठी साहित्यिक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर बिनविरोध निवड करण्यात आली.

विश्वास पाटील म्हणाले,"साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप ऋणी आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मी सातत्याने केलेले लेखन, दिग्गज साहित्यिकांकडून मिळालेली प्रेरणा आणि भारतभर लोकप्रिय ठरलेल्या माझ्या कादंबऱ्या, या सगळ्याची पुण्याई यामागे आहे, अशी माझी भावना आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com