Nagpur RTO : नागपूरमध्ये आरटीओ अधिकारी बदल्यांचे रॅकेट? पंचतारांकित हॉटेलमध्ये काय शिजलं?

Nagpur RTO : बदल्यांच्यामागे आरटीओचा निवृत्त अधिकारी असल्याचा संशय, आयुक्तांची माहिती!
Nagpur RTO : Amitesh Kumar
Nagpur RTO : Amitesh KumarSarkarnama

Nagpur RTO : नागपूर आरटीओमध्ये बदलीचं एक मोठं रँकेट सुरू आहे का? याची चौकशी नागपूर पोलिसांची एसआयटी करणार आहे. यामागचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी नागपूरमधील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये दोन परिवहन निरिक्षक बदलीसंदर्भात बोलत असताना आढळून आले आहे. (RTO Transfer)

Nagpur RTO : Amitesh Kumar
Karmala News : बागल भाजपच्या वाटेवर : भाजप नेत्यांना निमंत्रण; मात्र ‘आदिनाथ’ला मदत करणाऱ्या सावंतांचा विसर

खाडे नावाचे निवृत्त परिवहन अधिकारी नागपूरात आले आहेत. खाडे यांनी नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील बदलीस पात्र असलेल्या, सर्व परिवहन अधिकाऱ्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले आहे, असे संभाषण या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले आहे. पोलिसांच्या एसआयटीमध्ये गुन्हे विभागासह, आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या एसआयटीने संबंधित पंचतारांकिंत हॉटेलमधील आठ सीसीटिव्ही कॅमेरे प्रत्येकी दहा तासांचे फुटेज ताब्यात घेतलं आहे.

Nagpur RTO : Amitesh Kumar
Kasba Peth : फडणवीसांनी कसब्याच्या पराभवाचं पोस्टमार्टेम केलं; आता रिपोर्टचा फटका कुणाला बसणार?

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. कुमार म्हणाले, नागपूरच्या एका हॉटेलमध्ये एक निवृत्त अधिकारी यऊम बदली संदर्भात काहींच्या भेटी घेतल्या होत्या, त्या संदर्भात त्यासाठी तपासाची एक टीम तयार करण्यात आलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com