Samajwadi Party and Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात जबरदस्त प्रदर्शन करत, 37 जागा जिंकून कमाल करून नवा इतिहास रचला. कारण, या आधी उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वात 35 जिंकल्या गेल्या होत्या.
या दमदार कामगिरीनंतर समाजवादी पार्टीचा(Samajwadi Party) आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. यामुळे आता समाजवादी पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधी रविवारी शिवपाल सिंह यादव यांच्या निवासस्थानी मुंबईतील पनवेल जिल्हाध्यक्ष आर.एन. यादव यांची बैठकही झाली.
प्राप्त माहितीनुसार या बैठकीत समाजवादी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक(Vidhan Sabha Election) लढवण्याच्या दृष्टीने रणनीतीवर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काय करता येईल, याबाबतही चर्चा झाली. शिवाय, महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली गेली.
काही दिवसांपूर्वीच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीच्या नेत्यांची बैठकही घेतली होती. याशिवाय अशातच महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनाही लखनऊला बोलावलं गेलं होतं आणि त्यांची अखिलेश यादव यांच्यासोबत बैठक झाली होती.
लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) उत्तर प्रदेशात 37 जागा जिंकल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देशभरात पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रविवारी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव यांनी महाराष्ट्र सपा प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली.
तर अखिलेश यादव यांनी केरळ समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. साजी पोथन थामस यांच्याशी लखनऊ येथे चर्चा केली. डॉ. थामस यांनी अखिलश यादव यांना डिसेंबर 2024 मध्ये केरळ दौऱ्यावर येण्यासाठी आमंत्रित केलं आणि सांगितलं की, केरळमध्ये समाजवादी पार्टीसाठी मोठी संधी आहे. समाजवादी पार्टी तिथे पंचातय निवडणुकीत भाग घेण्यास तयार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.