राजकारण तापलं! संजय राऊत थेट राहुल गांधींच्या भेटीला

लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
Sanjay Raut, Rahul Gandhi
Sanjay Raut, Rahul Gandhisarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यावरुन मोठे राजकीय वादळ उठले आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

Sanjay Raut, Rahul Gandhi
मंत्र्यांचा मुलगा मोकाट पण प्रियांका गांधींवरच गुन्हा दाखल अन् अटकही!

लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. त्यात चार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश होता. मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर ते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याने या घटनेत शिवसेना काँग्रेससोबत उभी राहणार असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे थेट काँग्रेसला पाठिंबा देणारा शिवसेना पहिलाच पक्ष आहे.

Sanjay Raut, Rahul Gandhi
सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजूर

राहुल गांधी यांच्या भेटी आधी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणले, प्रियंका गांधी यांनी दाखवलेली हिमंत ही विरोधकांचे बळ वाढवणारी आहे. दरम्यान, लखीमपूर घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र निषेध केला आहे. पवार म्हणाले, हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्यांची जबाबदारी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. या घटनेबद्दल दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येत असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यांच्याकडे हुकूमत आहे म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सफल होणार नाहीत. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाही आहे. जालियनवाला बाग मध्ये जशी परिस्थिती झाली होती. तीच परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे, असा हल्लाबोल पवार यांनी केला. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, ते आंदोलन शांतीने सुरू आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लखीमपूर इथे जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते. आपल्या मागण्या मांडत होते. त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे पवार म्हणले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com