'ईडी' कारवाईने दुखावलेले राऊत असे चवताळले की सोमय्यांना ऑन कॅमेरा शिव्या देवून गेले

Kirit Somaiya | Sanjay Raut | Shivsena | BJP | : काल ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांना अडचणीत आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) आता स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे. लिलावात निघणारी भारतीय नौदलाची 'युद्धनौका विक्रांत' (INS Vikrant) वाचवण्यासाठी २०१३-१४ च्या दरम्यान किरीट सोमय्यांनी लोकवर्गणीतून निधी जमा केला होता. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचे आता माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ता धिरेंद्र उपाध्याय यांनी राजभवनाकडे याबाबत माहिती मागविली होती.

आयएनएस विक्रांत युद्धनौकेला ऐतिहासिक महत्त्व आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये युद्धकाळात या नौकेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हे जहाज भंगारात न जाता त्याचे संग्रहालयात रुपांतर व्हावे अशी भूमिका सोमय्यांनी घेतली होती. मात्र यासाठी राज्य शासनाकडे पैसे नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर उपाय म्हणून आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकवर्गणीतुन निधी उभारला होता. पण हा निधी राजभवनापर्यंत पोहोचलाच नसल्याची माहिती आता समोर आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी नौदलाचे काही माजी सैनिक लवकरच पोलीस तक्रार दाखल करणार आहेत.

Sanjay Raut
पवार-गडकरी-राऊत एकाच पंगतीत ; EDच्या कारवाईनंतर पवारांच्या घरी स्नेहभोजन

सोमय्या यांचे हे प्रकरण समोर येताच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल कार्यालयात हे पैसे जमाच झाले नाहीत तर हे पैसे गेले कुठे? सोमय्यांनी पैसे निवडणुकीसाठी वापरले का, की मुलाच्या कंपनीत गुंतवले असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. शिवाय सोमय्या चार्टर्ड अकाऊंटटं असल्याने असा पैसा कुठे जिरवायचा, हे त्यांना चांगलच माहित आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी केलेला हा गुन्हा देशद्रोहाचा आहे, जो बोफोर्स पेक्षाही गंभीर आहे. राज्यातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी राऊतांनी केली.

विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे कुठे गेले, हा घोटाळा ५७ कोंटीचा नव्हे तर १०० कोटींपेक्षाही जास्त असल्याची शंकाही राऊतांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जर केंद्रातील ईडी आयकर, सीबीआय या तपास यंत्रणा पारदर्शक असतील तर त्यांनीही या प्रकरणाचा तपास करावा, हा पैसा जमा झाला नाही तर, कुठे गेला, पैसा कुठे वापरला गेला, याचा सखोल तपास करावा अशी मागणीही यावेळी संजय राऊतांनी केली आहे.

राऊत सोमय्यांवर भलतेच संतापलेले :

संजय राऊत यावेळी बोलताना बरेच संतापले पाहायला मिळाले. यातून त्यांनी सोमय्यांना ऑन कॅमेरा अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. याला कारण देखील तसेच होते. कालच राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. याच कारवाईमुळे राऊत दुखावलेले त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होते. तसेच आपण कितीही पुरावे दिले तरी केंद्रीय यंत्रणा भाजप नेत्यांवर कारवाई करत नाही, असाही आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com