महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी पिस्तूल पुरवले होते.. तुषार गांधींचा गंभीर आरोप

Tushar Gandhi : २६ आणि २७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले.
Tushar Gandhi, Latest News
Tushar Gandhi, Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शने सुरू केले.

दरम्यान, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नथुराम गोडसे यांना गांधी हत्येसाठी सावरकर यांनी पिस्तूल हे ग्वाल्हेर येथून पुरवले होते,असा खळबळजनक आरोप केला.यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. (Tushar Gandhi, Latest News)

Tushar Gandhi, Latest News
संभाजी भिडे नरमले.. महिला आयोगाला मागितली १० दिवसांची वेळ

तुषार गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक पुरवली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत गोडसेकडे हत्या करण्यासाठी शस्त्र नव्हते,असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे. तुषार गांधी याबाबत प्रसारमाध्यमांशीही बोलले. ते म्हणाले, मी इतिहासात जी नोंद आहेत,तेच सांगत आहे. इतिहासात हेच सांगितले आहे. पोलिसांच्या 'एफआयआर'मध्येही तशी नोंदही आहे.

तुषार गांधी पुढे म्हणाले की, २६ आणि २७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात ते संपूर्ण मुंबईत फिरले. मात्र,या भेटीनंतर ते थेट दिल्लीला गेले.तिथून ग्वाल्हेर गेले. तिथे त्यांनी सावरकवादी परचुरेंची भेट घेतली.यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडले.मी हेच सांगितले असून नवीन आरोप केलेला नाही.

Tushar Gandhi, Latest News
हिंदुत्व, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी कायमच मतभेद ; राऊतांच्या वक्तव्याने 'मविआ'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

दरम्यान, ते पिस्तूल आणि सावरकर यांचा कोणताही संबंध नसल्याचा एक संदर्भ हा "लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी" या पु.ल.इनामदार लिखित पुस्तकातून स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी समोर आणला आहे. पु.ल.इनामदार हे त्या खटल्याशी संबंधित वकील असल्याचे रणजित सावरकर यांनी सांगितले आहे. गांधी आणि सावरकर यांचे ‘वंशज’ आमनेसामने आल्याने या वादात आता ऐतिहासिक संदर्भ देऊन आरोप प्रत्यारोप किंवा स्पष्टीकरण दिले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com