Kapil Sibal Tweet: सिब्बल ठाकरेंसाठी पुन्हा मैदानात; शिंदेंवर थेट हल्लाबोल : षडयंत्र रचणारे संधीसाधू...

Kapil Sibal On Eknath Shinde: सिब्बल यांनी प्रभू रामांनी सत्याचा मार्ग निवडत त्याग केल्याची आठवण करुन देत शिंदे-फडणवीसांना संधीसाधू म्हटले आहे.
Eknath Shinde, Kapil Sibal
Eknath Shinde, Kapil SibalSarkarnama
Published on
Updated on

Kapil Sibal, Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी टीका केली. सिब्बल यांनी प्रभू रामांनी सत्याचा मार्ग निवडत त्याग केल्याची आठवण करुन देत शिंदे-फडणवीसांना संधीसाधू म्हटले आहे.

या संदर्भात कपिल सिब्बल यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये सिब्बल म्हणाले, शिंदे अयोध्येत आहेत. प्रभू राम यांनी प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला व त्याग केला. बाळासाहेब ठाकरेंनीही हे गुण आत्मसात केले होते. षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत.'' असा सणसणीत टोला कपिल सिब्बल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. कपिल सिब्बल यांचे हे ट्वीट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी रिट्वीट केले आहे.

Eknath Shinde, Kapil Sibal
MLA Raju Patil News: आता तरी शहाणे व्हा; 15 दिवसांत निर्णय घ्या, आमदार पाटील यांचा प्रशासनाला इशारा

दरम्यान, शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची माहिती देताना म्हटले होते की ''जय श्रीरामच्या जयघोषात अयोध्या नगरीत माझे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले. यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यानंतर शिवसेना व भाजपच्या सर्व सहकारी मंत्री आणि आमदार यांच्यासह प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या रामलल्लाच्या मंदिरात महाआरती केली.''

Eknath Shinde, Kapil Sibal
Maratha Reservation : ''मराठा आरक्षणासाठी रिव्यूव्ह पिटीशन 'ही' शेवटची संधी; राज्यसरकारने न्यायालयात जोरदारपणे बाजू मांडावी''

''अयोध्येतील हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. महंतांची भेट घेतली. यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com