शिमला : भाजपमध्ये (BJP) सर्वकाही आलबेल असल्याची स्थिती नाही. हिमाचल प्रदेशातील पोटनिवडणुकीत (Himachal Pradesh Election) दणकून पराभव झाल्यानंतर आता भाजपला आणखी धक्के बसू लागले आहेत. राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर टीका करत प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार कृपालसिंग परमार (Kripal Sing Parmar) यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर बुधवारी सकाळी त्यांनी कार्यकारिणी सदस्यत्वाचाही तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे प्रदेश भाजपमध्ये वादळ उठलं आहे.
मंडी लोकसभा मतदारसंगासह तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे राज्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची बैठक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याआधी 24 व 25 तारखेला कार्यकारिणी सदस्यांची बैठक आहे. त्यामध्ये पराभवावर चिंतन केले जाणार आहे. तसेच पुढील धोरणही निश्चित केले जाणार असल्याचे समजते.
पुढील वर्षीच्या अखेरीस हिमालच प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने पोटनिवडणूकीतील पराभव गांभीर्याने घेतला आहे. पण या स्थितीतच परमार यांच्यासारख्या बड्या नेत्याने पदांचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. परमार हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांना फतेहपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते.
राजीनामा देताना परमार यांनी प्रदेश नेत्यांकडून आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी मांडलेल्या काही मुद्यांवर गांभीर्याने विचार केला जात नसल्याचाही त्यांचा दावा आहे. पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवार नीलम सरकार यांनीही भाजप नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला विश्वासात न घेता मतदारसंघात नियुक्त्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
माजी मंत्री व आमदार रमेश ढवला यांनीही वरिष्ठ नेत्यांकडून मिळणाऱ्या वागणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाढ वाढत चालल्याची चर्चा आहे. पोटनिवडणुकीतील पराभव तसेच नेत्यांमधील नाराजी वाढत चालल्याने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोरील अडचणी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तराखंड, गुजरातप्रमाणेच तिथेही मुख्यमंत्री बदल होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.