शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक

कर्नाटकच्या बेंगळूरमध्ये बुधवारी (१६ डिसेंबर) काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना केली.
Karnataka, desecration of Shivaji Maharaj statue

Karnataka, desecration of Shivaji Maharaj statue

Published on
Updated on

मुंबई : कर्नाटकच्या बेंगळूरमध्ये बुधवारी (१६ डिसेंबर) काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना केली. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या काही विकृत समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातील (Karnatak) रणधीर सेनेशी संबंधित सात जणांना अटक करण्यात आली आहे.

बंगळुरू (Bangalore) सेंट्रल विभागाचे डी. सी. पी. अनुचेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अटक केलेल्या सात जणांनी या कृत्याची कबुली दिली आहे. शनिवारी (१८ डिसेंबर) संध्याकाळी पाच जणांना आणि रविवारी (१९ डिसेंबर) सकाळी दोन जणांना अटक करण्यात आले असल्याचेही यावेळी डी. सी. पी. अनुचेत यांनी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांनी लाल पिवळा झेंडा जाळला, त्याचा निषेधार्थ त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई ओतल्याची कबुली या संशयितांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Karnataka, desecration of Shivaji Maharaj statue</p></div>
आमदार मुनगंटीवार म्हणाले, जीव तोडून केलाय तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा...

बंगळूरमधील सदाशिव नगर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तसेच, यावेळी घटनेवेळी वापरलेली वाहने आणि साहित्य पोलिसांनी जप्त केली आहे. यातील आणखी काही जण फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर देशभरातून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती.

तर दूसरीकडे, आता या प्रकरण ताजे असतानाच आता थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ''पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे,'' असं मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने तर आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर त्वरित कारवाई केली जात नाही, त्याऐवजी ही गोष्ट छोटी असल्याचे सांगत त्यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळलं असल्यामो बसवराज बोम्मई यांच्याविरोधा संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com