DM Anupriya Dubey Latest News
DM Anupriya Dubey Latest NewsSarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांच्या आजारी गायीसाठी सात डॉक्टरांची ड्युटी; दिवसांतून दोनदा तपासणीचे आदेश

मागील महिन्यांतच दिल्लीत दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
Published on

लखनौ : आपल्याकडील पाळीव प्राण्यांसाठी अनेकांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे प्रकार पाहायला मिळतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. एका जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आजारी गायीची काळजी घेण्यासाठी एक-दोन नव्हे तर सात पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना ड्युटी लावली आहे. याची जोरदार चर्चा उत्तर प्रदेशात रंगली आहे. (DM Anupriya Dubey Latest News)

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हा प्रकार आहे. जिल्ह्याचे मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. तिवारी यांचे याबाबत आदेश सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी अनुप्रिया दुबे यांच्या आजारी गायीची काळजी घेण्यासाठी सात पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

DM Anupriya Dubey Latest News
पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं पण पंकजा मुंडेंचं मौन का? राजकीय चर्चांना उधाण

या आदेशानुसार प्रत्येक डॉक्टरांना वार ठरवून देण्यात आला आहे. या डॉक्टरांनी त्यादिवशी सकाळी आणि सायंकाळी गायीच्या आरोग्याची तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल मुख्य अधिकाऱ्यांना देण्यास सांगितला आहे. सायंकाळी सहा वाजता मोबाईलद्वारे माहिती कळवायला सांगितले आहे.

अतिरिक्त पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्यात समन्वय ठेवण्यास सांगितले आहे. एखाद्या दिवशी एखादा अधिकारी गैरहजर असल्यास त्यांच्याजागी पर्यायी डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. डॉ. तिवारी यांचे हे पत्र नऊ जून रोजीचे असून सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

DM Anupriya Dubey Latest News
शरद पवारांना वेगळ्या पध्दतीनं समोर जायचं असेल! बच्चू कडूंची गुगली

मागील महिन्यात दिल्लीतील एका आयएएस जोडप्याने आपल्या श्वानासाठी संपूर्ण स्टेडियम वेठीस धरल्याचे समोर आले होते. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर दोघांचीही बदली करण्यात आली. तर उत्तर प्रदेशात 2017 मध्ये असाच प्रकार घडला होता. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची म्हैस शोधण्यासाठी रामपूर पोलीसांची फौज कामाला लावण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com