बीजिंग : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वेगाने वाढू लागल्याने चीनमधील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. असे असूनही शांघायमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले असून, ही कोरोनाची चौथी लाट (Fourth Wave) असल्याचा धोका व्यक्त होत आहे. (China Corona News Update)
शांघाय हे चीनमधील सर्वांत मोठे शहर असून, कडक लॉकडाऊन लावलेला असून, तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या तिन्ही रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही वृद्ध असून, त्यातील एक 89 वर्षांचा तर दोघे 91 वर्षांचे होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होता, अशी माहिती सरकारी आरोग्य यंत्रणांनी दिली आहे. शांघायमध्ये मागील 24 तासांत 22 हजार 248 कोरोना रुग्ण आढळले. त्यातील 2 हजार 417 लक्षणे नसलेले आहेत. याआधी 19 मार्चला दोन कोरोना मृत्यूंची देशात नोंद झाली होती. त्याआधी सुमारे वर्षभर चीनमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता.
चीनमधील अनेक मोठ्या शहरात कोरोनाविषयक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाचे प्रमाण मागील दोन वर्षातील अधिक तीव्र आहे. यामुळे प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांनी घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. सर्व प्रौढांना तीन पीसीआर चाचण्या करण्यास सांगितले आहे. काही शहरांत अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला असून, शहरातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
रॅपिड अँटिजेन चाचणीचे किट सार्वजनिकरीत्या वापरासाठी उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणांचे सुस्तावलेले वरिष्ठ अधिकारी यामुळे चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा करणयात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन टाळावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला धोका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी निर्बंध लादणाऱ्या शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.