शरद पवार हेच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? : ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत घेतली भेट

Sharad Pawar | Mamata Banerjee : दिल्लीत घडामोडींना वेग...
Sharad Pawar | Mamata Banerjee
Sharad Pawar | Mamata BanerjeeSarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह (BJP) विरोधकही कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी १५ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ६ जनपथवरील निवासस्थानी २२ पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेससह आम आदमी पक्षही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. (Sharad Pawar Latest news)

दरम्यान, विरोधी पक्षांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्याच नावाची चाचपणी सुरु केल्याचे वृत्त आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. परंतु आज ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत बैठकीपूर्वी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनीही पवार यांची भेट घेत घेतली. त्यामुळे तेच विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. (Sharad Pawar Latest news)

दुसरीकडे पवार यांनी मात्र राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला असल्याची माहिती येचुरी यांनी दिली. ‘‘ पवार हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि त्यांच्यात रमणारे नेते आहेत त्यांच्याकडे राष्ट्रपतिपदाची जबाबदारी देणे, हे त्यांना कितपत पटेल हे माहिती नाही. मात्र याबाबतचा निर्णय स्वतः पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे. विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार उभा करून आपली एकजूट दाखविण्यासाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या निवडणुकीची रणनिती करण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. याशिवाय विरोधी ऐक्याचा संदेश देण्यासाठी प्रसंगी आपला उमेदवार न देता सहमतीच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचीही तयारी दर्शवली. (Sharad Pawar Latest news)

त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनीही राष्ट्रपती निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र पाठवून १५ जून रोजी बैठक बोलावली आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि डाव्यांचा या बैठकीला नकार दिला होता. ही बैठक म्हणजे सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस नव्हे तर तृणमूल काँग्रेसच सक्षम पर्याय असल्याचे दर्शविणारी असल्याचा सूर काँग्रेसच्या गोटात होता. मात्र विरोधी पक्षांची एकजूट कायम दाखविण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसने सहमती दर्शवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com