Karnatak Election 2023: शरद पवार उतरणार कर्नाटकाच्या मैदानात : राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी ताकद पणाला लावणार

Sharad Pawar | आता खुद्द शरद पवार हेदेखील निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Karnatak Elections 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. पण कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळानंतर त्यांनी राजीनामा मागेही घेतला. यानंतर या गोंधळात मात्र कर्नाटकातील (Karnatak Elections) प्रचार मात्र मागे पडला होता. पण कर्नाटक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. (Sharad Pawar will enter the field of Karnataka: Will stake his strength for NCP candidates)

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतवलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकत देण्यासाठी शरद पवार कर्नाटकमध्ये दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाकटकात नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेळगावातील निपाणी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला तर फौजिया खान, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ,आमदार रोहित पवार, रोहित पाटील यांनी सभा घेतल्या. (Sharad Pawar at karnatak Election)

Sharad Pawar
Karnataka Election 2023 : मतदानापूर्वीचं काँग्रेसनं मारलं मैदान ; काँग्रेसला 'अच्छे दिन', कर्नाटकातील मोठी वोट बँक...

त्यानंतर आता खुद्द शरद पवार हेदेखील निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. शरद पवार यांनी यांची पहिली जाहीर सभा सोमवारी निपाणी येथे होणार आहे . मुंबईत घडामोडी सुरू असताना प्रचाराचा भार फौजिया खान ,अमोल मिटकरी , रोहित पाटील यांनी उचलला होता. शेवटच्या टप्प्यात निपाणीतील उत्तम पाटील, गुलबर्गा येथील हरी आर आणि राणेबेन्नूर येथील आर. शंकर या तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे. (Karnatak Election 2023 latest news )

दरम्यान,  शरद पवार हे रविवारी (7 मे) पासून दोन दिवस सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते निपाणीचा दौराही करणार आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या एकजुटीबाबत भाष्य केलं आहे.

"युती करायची असेल तर विविध विचारांचे पण मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन जर सर्व एकत्र येऊ शकले तर विरोधकांची एकजुट होईल. यासाठी नितीश कुमार काम करत आहेत. आणखी काही लोकांचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या सर्वांना सहकार्य करणं प्रोत्साहित करणं महत्वाचं आहे", असं शरद पवार यांनी सांगितलं.

Edited By- Anuradh Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com