Shashi Tharoor News : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात...

Lok Sabha Election 2024 : देशाची वैविधता, संस्कृतीचे सन्मान करत सर्वघटकांच्या-सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करते.”
Shashi Tharoor News
Shashi Tharoor NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसचे खासदार शशी थरूर लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. काँग्रेसचं प्रचार करत असताना त्यांना एक प्रश्न विचारला गेला. याचं त्यांना भलतंच आश्चर्य वाटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी पर्याय आहे का? असा थेट प्रश्न थरूरांना केला गेला. प्रश्न ऐकताच त्यांनी अशा गोष्टीला नाकारलं. लोकशाहीमध्ये असा प्रश्न अवास्तव असल्याचे त्यांनी सुनावले. भाजपकडून हा प्रश्न सातत्याने केला जातो. पंतप्रधानांना पर्याय ठरु शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांकडे नसल्याचे सांगण्यात येते. (Lok Sabha Election 2024)

Shashi Tharoor News
Praniti Shinde Vs BJP : भाजपवाले आता माझं चारित्र्यहनन करतील; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

आपल्या देशाच्या संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये आपण केवळ एका व्यक्तीला निवडून देत नाही तर पक्षाला आणि त्यांच्या प्रतिनिधींना निवडून देतो. पक्षांच्या आघाडीला निवडतो, असे थरुर म्हणाले. पंतप्रधान मोदींना पर्याय हा अनुभवनिष्ठ, सक्षम असे विवध नेत्यांचा समूह आहे. हा समूह भारतीतील लोकांना उत्तरदायी आहे. तर व्यक्तीगत हेव्यादाव्यांपासून, वैयक्तित अहंकारापासून दूर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात थरुर यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. "माध्यम प्रतिनिधींनी मला पुन्हा असे विचारले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पर्याय कोण आहे? आपल्या देशाच्या संसदीय लोकशाही प्रणालीत हा प्रश्न गृहीत धरला जात नाही.

Shashi Tharoor News
Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिणमध्ये मोदी की पवारांचा करिश्मा चालणार?

आपल्या देशात राष्ट्राध्यक्षाची पद्धत किंवा अध्यक्षीय लोकशाही नाही. आपण पक्षांच्या आघाडीला निवडून देतो. हेच पक्ष, समूह देशाची वैविधता, संस्कृतीचे सन्मान करत सर्वघटकांच्या-सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करते.”

Shashi Tharoor News
NCP Political Crisis News : अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन नाही! सुप्रीम कोर्टात याचिका

पंतप्रधान पदाच्या निवडीवर थरुर यांनी भाष्य केले. "लोकशाही आणि वैविधता जोपासणे हे आपले पहिले उद्दीष्ट्य आहे. याच्या समोर केवळ पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणे हे फारच दुय्यम स्वरुपाचे काम आहे, असे थरुर (Shashi Tharoor) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com