शत्रुघ्न सिन्हांचा शाहरुखला टोमणा ; ड्रग्ज प्रकरणावरुन म्हणाले, 'मी भाग्यवान'

आर्यनच्या अटकेनंतर बॉलीवुडमधील काही कलाकार शाहरुख खान, आर्यन खान (aryan khan) यांच्या समर्थनासाठी पुढे आले. तर काहींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही.

शत्रुघ्न सिन्हांचा शाहरुखला टोमणा ; ड्रग्ज प्रकरणावरुन म्हणाले, 'मी भाग्यवान'
sarkarnama

मुंबई : 'किंग खान'चा मुलगा आर्यन खान याची काल ड्रग्ज प्रकरणात जामिनावर मुक्तता झाली आहे. जवळपास एक महिन्यानंतर तो घरी परतला आहे. आर्यनच्या अटकेनंतर बॉलीवुडमधील काही कलाकार शाहरुख खान, आर्यन खान (aryan khan) यांच्या समर्थनासाठी पुढे आले. तर काहींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी शाहरुख खानला टोमणा लगावला आहे.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ''माझी तीन मुलं सोनाक्षी, लव आणि कुश हे ड्रग्ज घेत नाहीत याचा मला आनंद आहे. सेलिब्रिटींसाठी त्यांच्या मुलांना योग्य दिशा दाखवणे आव्हानात्मक असते. मी सुरुवातीपासून विश्वास ठेवतो, मी उपदेश करतो आणि आचरण करतो. मी तंबाखूविरोधी अभियान करतो. मी नेहमी ड्रग्जला नाही म्हणतो.'' एनडीटीव्हीला मुलाखत देतांना शत्रुघ्न सिन्हा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

''आर्यन हा शाहरुख खानचा मुलगा असल्याने त्याला माफ केले जाऊ नये. तो कोणी का असेना पण म्हणून त्याला टार्गेट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपली मुले एकटी राहणार नाहीत, चुकीच्या संगतीत पडू नयेत किंवा चुका होणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी. पालकांनी आपल्या मुलांसोबत किमान एक वेळ जेवण केले पाहिजे,'' असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.


शत्रुघ्न सिन्हांचा शाहरुखला टोमणा ; ड्रग्ज प्रकरणावरुन म्हणाले, 'मी भाग्यवान'
सचिन वाझे उद्या कोणाची नावे सांगणार? मुंबई गुन्हे शाखा घेणार ताब्यात

अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawala) ही आर्यन खानसाठी जामीनदार झाली आहे. न्यायालयाने आर्यन खानला जामिन देताना काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत. यात असा गुन्हा परत करु नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीरांवर प्रभाव टाकू नये, देश सोडून जावू नये अशा अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा पासपोर्ट देखील विषेश न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. आरोपींना तपास अधिकारी यांना न सांगता मुंबईबाहेर जाता येणार नाही. माध्यमांशी बोलण्यास देखील आर्यन खानला मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात एनसीबी ऑफिसमध्ये हजर राहावे लागणार आहे. प्रत्येक सुनावणीला वेळेत हजर राहण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सुचनाही आर्यन खानला देण्यात आल्या आहेत.

आर्यन खान प्रकरणात झालेल्या सुनावणीत अमित देसाई आणि मुकुल रोहतगी हे सर्व कायदेतज्ञ न्यायालयात हजर होते. मात्र आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद अत्यंत महत्वाचा ठरला. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज किंवा त्याने ड्रग्ज घेतल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीही केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता.

नवाब मलिकांनी टि्वट केलेल्या फोटोतील व्यक्ती कोण?

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत दररोज नवीन खुलासे करीत आहेत. मलिक यांनी आता आणखी एक फोटो टि्वट केला आहे. या फोटोतील व्यक्ती कोण असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे, त्यांची बहिण वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. यास्मिन वानखेडे यांचे अब्दुल अझिज खान यांच्यासोबत लग्न झाले होते. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावर अब्दुल अझीज यांचे नाव आहे. मलिक यांनी टि्वट केलेला फोटो हा अब्दुल अझिज यांचा असल्याचे समजते. यास्मिन वानखेडे यांनी ओळख लपविण्यासाठी अब्दुल अझिजसोबत घटस्फोट घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com