UP-गोव्यात शिवसेनेला गिफ्ट; स्वतःची ओळख घेवून उतरणार मैदानात

Assembly Election 2022 : शिवसेना (Shivsena) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यामध्ये (Goa) निवडणूक लढवत आहे.
Uddhav Thackeray - Shivsena
Uddhav Thackeray - Shivsena Sarkarnama

दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला एक सुखद धक्का दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. शिवसेना (Shivsena) यावेळी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा या राज्यांमध्ये (Goa) निवडणूक लढवत आहे. दरम्यान या निवडणूका शिवसेना (Shivsena) आता स्वतःच्या 'धनुष्य-बाण' या चिन्हावर लढवू शकणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला त्यांचे महाराष्ट्रातील पारंपारिक धनुष्य-बाण हे चिन्ह मिळाले आहे.

शिवसेना मागच्या काही काळापासून देशभरात विस्तारण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवत आहे. त्यानुसार यापुर्वी गुजरात, बिहार या राज्यांमध्ये निवडणूक लढवल्यानंतर आता शिवसेना गोवा आणि उत्तर-प्रदेशच्या मैदानात उतरली आहे. उत्तर-प्रदेशमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर गोव्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही निवडणूक लढवताना आता शिवसेनेला त्यांचे धनुष्य-बाण हे महाराष्ट्रातीलच पारंपारिक निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

Uddhav Thackeray - Shivsena
सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा अभूतपूर्व राडा; अध्यक्षांच्या पतीसह दिराला मारहाण

कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला संपूर्ण देशात एकच निवडणूक चिन्ह राखीव असते. मात्र प्रादेशिक पक्षाला केवळ त्यांच्या राज्यापुरतेच चिन्ह राखीव असते. त्यामुळे कोणत्याही प्रादेशिक पक्षाला इतर राज्यामध्ये निवडणूक लढवताना त्यांची ओळख असलेलेच चिन्ह मिळेल असे होत नाही. शिवसेना प्रादेशिक पक्ष असल्याने त्यांना केवळ महाराष्ट्रामध्येच 'धनुष्य-बाण' हे निवडणूक चिन्ह राखीव आहे.

बाहेरच्या राज्यांमध्ये निवडणूक लढवताना प्रादेशिक पक्षाला आपल्या पारंपारिक चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागतो. आयोगाकडे तशी मागणी केल्यास आणि संबंधित राज्यातील एखाद्या प्रादेशिक पक्षाकडे मागणी करण्यात आलेले चिन्ह नसल्यास केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाशी बोलून संबंधित पक्षाला हवे असलेले चिन्ह देवू शकतो. दादरा-नगर हवेलीत झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह नव्हते. तिथे शिवसेनेला बॅटिंग करणारा खेळाडू या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com