नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) औरंगाबाद येथील शिवसंवाद यात्रेत माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकर सहभागी झाले होते. पण सोमवारी ते दिल्लीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आयुष्यभर शिवसेनेतेच (Shiv Sena) राहणार असल्याचं खोतकर यांनी मागील आठवड्यातच जाहीर केलं होतं. (Arjun Khotkar Latest News)
मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी दिल्लीत आहेत. यादरम्यान महाराष्ट्र सदनात अर्जून खोतकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ते शिंदे यांच्याशेजारी उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही आहेत. तसेच शिवसेनेतील काही बंडखोर खासदार आणि माजी मंत्री सदाभाऊ खोतही या फोटोत दिसत आहेत.
खोतकर यांच्या या भेटीनं ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. खोतकर शिंदे गटात सामील झाले असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत खोतकर किंवा शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण मागील काही दिवसांपासून खोतकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर खोतकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समजते.
ईडीने खोतकर यांचा साखर कारखाना नुकताच जप्त केला आहे. त्यामुळे तेही शिंदे गटात जाऊ शकतात, अशी चर्चा होती. पण खोतकर यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, दिल्लीत (Delhi) महाराष्ट्र सदनात माझी आणि शिंदे यांची समोरासमोर भेट झाल्याने आमच्या दोघांमध्ये नमस्कार सुद्धा झाला. नमस्कार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का?, अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली होती.
या भेटीनंतर सोशल मीडियात (Social-media) त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या अफवांवर त्यांनी वैतागून आपलं स्पष्टीकरणही दिलं होतं. मी आयुष्यभर शिवसेनेतच (Shivsena) राहणार, असे ते म्हणाले होते. खोतकर म्हणाले होते की, दिल्लीत मी माझ्या वैयक्तिक कामासाठी 4 दिवस होतो. आणि दिल्लीत असताना महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री शिंदे आणि माझी समोरासमोर भेट झाली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि यापुढेही राहणार असून आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.