दादरामार्गे शिवसेनेची दिल्लीकडे कूच, उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच!

जवळपास ३० हजार मतांनी शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
Sanjay Raut-uddhav thackeray
Sanjay Raut-uddhav thackeray Twitter

मुंबई : दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील (Dadra Nagar Haveli Union Territory) पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. यात शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या सध्या आघाडीवर असून त्यांना ८४ हजार ४७६मत मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार महेशभाई गावित यांना ४७ हजार २२४ मत मिळाली आहेत. त्यामुळेच जवळपास ३७ हजार मतांनी शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र त्यापुर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या विजयाची घोषणा केली आहे. तसेच हा विजय म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.

Sanjay Raut-uddhav thackeray
...म्हणून मला मंत्री व्हावे असे वाटले नाही : संजय राऊत

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे पहिले पाऊल. उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंचा हातात हात घेतलेला फोटो टाकत #Chalodelhi हा सुचक हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळेच आता संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवणारच हा निर्धार त्यांनी या फोटोतुन व्यक्त केल्याचे दिसत आहे.

राज्याबाहेर पहिला खासदार करण्याच्या निर्धाराने शिवसेनेने देखील ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, (Gulabrao Patil) शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापासून अनेक खासदारांवर तेथील प्रचाराची धुरा सोपविण्यात आली होती. दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या आत्महत्येने ही जागा रिक्त झाली होती. तिथं सध्या पोटनिवडणूक जाहिर झाली होती.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेनजीक असलेल्या दादरा-नगर हवेली या मतदारसंघाचे सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत मरीन ड्राईव्हवरील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफूल्ल खेडा पटेल यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद करून ठेवले होते. त्याआधारे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Sanjay Raut-uddhav thackeray
संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीचे शिल्पकार, शिल्पाला ओरखडा जाऊ देऊ नका!

१९८९ ला डेलकर हे प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर १९९१ आणि १९९६ ला ते कॉंग्रेसचे खासदार होते. तर, १९९८, १९९९ आणि २००४ ला भाजपकडून खासदार झाले. २००९ ला त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ ला मात्र, कॉंग्रेसकडून न लढता पुन्हा अपक्ष म्हणून लढले व निवडूनही आले होते. त्यांच्या निधनानंतर मागच्या महिन्यात ७ तारखेला स्व. डेलकरांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी मुंबईत येऊन मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच कलाबेन यांना दादरा, नगर, हवेलीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com