Dhule Politics : अत्यंत चिवट लढत देत खासदार शोभा बच्छाव यांनी काँग्रेसचा असलेला धुळे गड भाजपकडून हिसकावला आहे. त्यांचा हा लढाऊपणा लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही दिसून आला. इंडिया आघाडीने विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात शोभा बच्छाव आघाडीवर होत्या. त्याचीच चर्चा धुळ्यासह दिल्लीतही होती.
18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारी (ता. 24) सुरूवात झाली. तत्पूर्वी इंडिया आघाडीतील खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन केले. या आंदोलनात धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव Shoba Bacchav यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी हातात संविधानाची प्रत घेत सरकारविरोधात आक्रमकपणे घोषणाबाजी केली.
ससंदेच्या आवारात इंडिया आघाडीने केलेल्या आंदोलनात शोभा बच्छाव काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पहिल्या ओळीत दिसून आल्या. त्यांनी जोरदारपणे सरकारच्या धोरणाबाबत घोषणाबाजी केली. या वयातही बच्छाव यांच्या आक्रमक बाण्याचा धुळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
कोण आहेत बच्छाव?
शोभा बच्छाव या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असून त्या 35 वर्षांपासून नाशिकच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस, महापौर, धुळे जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी, नाशिकचे आमदार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या महिला हक्क आणि कल्याण समितीचे पद भूषवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.