Delhi News : लोकसभा निवडणुका तोंडावर आली असताना सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्या पाठीमागील अडचणीचा ससेमिरा सुटत नसल्याचे दिसत आहे.
केजरीवाल यांनी आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी बुधवारी फेटाळून लावली. तर दुसरीकडे दिल्ली सरकारमधील मंत्री असलेले राज कुमार आनंद (Rajkumar ananad) यांनी बुधवारी मंत्रीपदाचा त्यासोबतच आपच्या (AAp) सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून दिल्ली सरकार व आम आदमी पक्षामध्ये खूप काही अंतर्गत घडामोडी घडत आहेत. आता दिल्ली सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा आणि आपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. (Arvind Kejriwal News)
काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यानंतर त्यांनी आत मंत्रिपदाचा राजीनामा देत पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे केजरीवाल व आपच्या अडचणी वाढल्या आहेत.दिल्लीत राज कुमार आनंद हे समाजकल्याण आणि कामगार मंत्री होते. त्यांच्या घरी ईडीने गेल्यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी छापेमारी केली होती. ७ कोटींहून अधिकची सीमाशुल्काची चोरी केल्याचा आरोप आनंद यांच्यावर आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बुधवारी त्यांच्या जामीनासाठी केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे. बुधवारी दिवसभरात तीन धक्के सहन करावे लागले आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन देखील फेटाळलेला आहे. मात्र, केजरीवाल अटकेत असताना देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. तुरुंगातूनच ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे म्हणून दिल्ली हायकोर्टमध्ये याचिक दाखल करण्यात आली होती.पण, हायकोर्टाने याचिकाकर्तेला खडे बोल सुनावत 50 हजार रुपयांचा दंड ठोठवला.