काबूल, वृत्तसंस्था : अफगाणिस्तान (Afganistan) काबीज केल्यानंतर तालिबान्यांची (Taliban) क्रुरता पुन्हा समोर येऊ लागली आहे. आता तालिबानने एका मुलाची निर्दयतेने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडील अफगाणिस्तान रेजिस्टन्स फोर्समध्ये (Afghanistan Resistance Force) असल्याच्या संशयावरून तालिबान्यांनी एका मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पंजशीरच्या एका निरीक्षकाने (Panjashir Observer) तनखार प्रांतात (Tankhar Prant) ही घटना घडल्याची माहिती ट्विट करत दिली.
- संंशयावरुन चिमुकल्याची हत्या
या निरीक्षकाने ट्विट करत म्हटले आहे की, तालिबानला त्याच्या वडिलांवर संशय होता. रेजिस्टन्स फोर्समध्ये वडील काम करत असल्याची शिक्षा मुलाला देण्यात आली. मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केली. या ट्विटमध्ये गोळी लागलेल्या मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसतो आणि लहान मुले त्याच्या आजूबाजूला रडताना दिसत आहेत.
येथील एका नागरिकाने सांगितलेली वस्तूस्थिती तर त्याहून अंगावर थरकाप आणणारी आहे. तालिबानचे दहशतवादी हे विनाकारण कोणालाही अडवतात त्यांना आधीच्या सरकारची माहिती विचाारली जाते. तसेच मोबाईल फोन हिसकावून घेतात. त्यांचे कॉल डिटेल्स आणि फोटो पाहतात. जर त्यात काही संशयास्पद आढळले तर त्या माणसाची जागीच हत्या करत आहेत.
- आधीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांची दिवसाढवळ्या हत्या
१५ ऑगस्टला अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर सत्ता स्थापन करताना तालिबानने देशातील युद्ध थांबले, आता कोणावरही सुडाची कारवाऊ होणार नाही, असे तालिबानने जाहीर केले होते. तसेच, आता देशात शांतता प्रस्थापित होईल, आपण सर्वांना माफ केल्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु जर कोणी चूक केली तर त्याला शिक्षा होणार असेही त्यांनी सांगितले होते. त्यात हात-पाय कापण्यापासून ते हत्या करण्यापर्यंत शिक्षा दिली जात आहे. आधीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या किंवा अमेरिकी सैनिकांना आश्रय देणाऱ्या लोकांवर अत्याचार करत आहेत. पंजशीरमध्ये रेजिस्टन्स फोर्सशी संबंधित लोकांचीही दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे.
- काबूल विद्यापीठात महिलांना प्रवेश नाही
तालिबानने नियुक्त केलेला कुलगुरू मोहंमद अश्रफ घैरत याने आज ट्विट करून, 'तालिबानने जोपर्यंत इस्लामिक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत काबूल विद्यापीठात महिलांना शिकवण्यात किंवा शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे सांगितले आहे. तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर विद्यापीठाचे नवीन धोरण जाहीर केले. त्यातला विद्यापीठाचा हा नवा आदेश १९९० च्या दशकातील तालिबानी राजवटीची आठवण करून देतो. २० वर्षांपुर्वी पुरुष नातेवाईक असेल तरच महिलांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी होती. याआदेशाचे पालन न केल्यास महिलांना मारहाण केली जायची. इतकेच नव्हे तर त्यांनी शिक्षणापासूनही वंचित ठेवले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.