Shreyasi Singh News : 17 वर्षांची मेहनत अन् भाजपच्या महिला आमदाराचे स्वप्न पूर्ण; आता ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणार

Shreyasi Singh Selected in Paris Olympic : : 17 वर्षांच्या मेहनतीनंतर श्रेयासी यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली. बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहेत.
shreysi singh
shreysi singh Sarkarnama

New Dehli News : पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत बिहारमधील भाजपच्या आमदार श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत निवड व्हावी यासाठी तिने 17 वर्ष मेहनत घेतली. त्यानंतर श्रेयासी यांचे ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघाचे श्रेयसी या प्रतिनिधित्व करीत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत शॉटगन ट्रॅप महिला स्पर्धेत त्या खेळणार आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी लक्ष्य भेदणार आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shreyasi Singh News)

ऑलम्पिकमध्ये खेळणाऱ्या पहिल्या बिहारी खेळाडू

अर्जुन पुरस्कार विजेत्या असलेल्या बिहारमधील भाजप आमदार श्रेयसी सिंह यांनी यापूर्वी कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत पदक पटकावले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी या पहिल्या बिहारी खेळाडू आहेत. श्रेयासी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना जमुई या मतदारसंघातून भाजपने (Bjp) उमेदवारी दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.

राजकारणात सुद्धा मारली बाजी

शूटर असलेल्या श्रेयसी सिंहचा (shreysi singh) बिहारमधील राजघराण्यात 29 ऑगस्ट 1991 मध्ये जन्म झाला. श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिल्या आहेत. श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घराण्यातूनच मिळाला. त्यामुळे त्यांनी राजकारणात सुद्धा बाजी मारली आहे.

मतदारसंघात आनंदाचे वातावरण

आमदार असलेल्या श्रेयसीचे शिक्षण दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून झाले. त्यासोबतच फरिदाबादमधून एमबीएची पदवी त्यांनी घेतली. त्यांची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः त्या मतदारसंघाच्या आमदार असलेल्या जमुई या मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीकडे लक्ष

श्रेयसी सिंह यांनी 2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. तर 2014 मध्येच शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत इंचॉन येथील 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे श्रेयसी यांनी ऑस्ट्रेलिया राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com