Shreyasi Singh News : बिहार भाजपच्या नेमबाज आमदार श्रेयसी सिंह; राजकारणानंतर आता ऑलिम्पिकही गाजवणार!

Shreyasi Singh Bihar BJP Shooter MLA : श्रेयसी सिंह यांच्याकडून भारतला पदाकची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे बिहारमधून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या त्या एकमेव खेळाडू देखील आहेत.
Shreyasi Singh
Shreyasi SinghSarakarnama
Published on
Updated on

Shreyasi Singh Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ची सुरुवात झालेली आहे. या क्रीडा महाकुंभात जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमधून तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये भारताचे 117 खेळाडू आहेत. त्यापैकी एक शॉटगन ट्रॅप शूटर श्रेयसी सिंह आहेत.

श्रेयसी सिंह या केवळ खेळाडूच नाही तर आमदारही आहेत. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील मतदारसंघाच्या भाजपच्या (BJP) आमदार आहेत. राजकीय मैदान गाजवल्यानंतर आता त्या पॅरिस ऑलिम्पिक गाजवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्याकडून भारतला पदाकची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे बिहारमधून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या त्या एकमेव खेळाडू देखील आहेत.

Shreyasi Singh
PM Modi called Manu Bhaker - Video : ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या मनू भाकेरला थेट पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले...

प्रारंभीपासूनच श्रेयसी सिंह (Shreyasi Singh) यांची खेळात आवड होती. त्या भारताच्या टॉप शॉटगन ट्रॅप शुटर पैकी एक आहेत. श्रेयसी यांनी 2014 मध्ये ग्लासगो येथील कॉमनवेल्थ गेम्सच्या डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं. याशिवाय 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांनी थेट सुवर्ण पदक पटकावून देशाचं नाव उंचावलं होते. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

Shreyasi Singh
H. D. Kumaraswamy News : ...अन् भर पत्रकारपरिषदेत केंद्रीयमंत्री कुमारस्वामींच्या नाकातून येवू लागलं रक्त!

श्रेयसी या शाही परिवारामधून येतात. त्यांचे वडील दिग्विज सिंह हे माजी केंद्रीयमंत्री होते. तर त्यांची आई पुतुल देवी या देखील खासदार होत्या. त्यांचे संगोपन अतिशय उच्च कुटुंबात झाले. याशिवाय त्यांनी फरिदाबाद मानव रचना विद्यापिठामधून एमबीएची पदवी मिळलेली आहे. शूटींग शिवाय त्यांनी राजकारणातही आपली किमया दाखवली आहे.

2020ची बिहार विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली आणि जमुई मतदारसंघामधून भरघोस मताधिक्क्य मिळवत विजय मिळवला. एक आंतरराष्ट्रीय शूटर असूनही श्रेयसी सिंह यांनी निवडणूक काळात तळागाळातील लोकांना भेटून त्यांच्याशी नाते घट्ट केले. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कायमच प्रयत्नशील असतात. त्यामुळे आता त्यांच्या पदकासाठी त्यांच्या मतदारसंघाबरोबरच संपूर्ण बिहार व भारतातून प्रार्थना केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com