यूपीएससीत टॉप करताच शुभम कुमार यांची अशीही फसवणूक

UPSC परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही तासांतच त्याच्या नावाने अनेक बनावट खाती उघडण्यात आली आहेत.
Shubham Kumar
Shubham KumarFile Photo

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत टॉपर आलेल्या शुभम कुमार यांना सध्या वेगळी चिंता सतावत आहे. एकीकडे सोशल मीडियात शुभम कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना हाच सोशल मीडिया त्रासदायकही ठरत आहे. UPSC परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही तासांतच त्याच्या नावाने अनेक बनावट खाती उघडण्यात आली आहे. यावरून त्यांची एकप्रकारे फसवणूक केली जात आहे.

शुभम कुमार हे बिहारमधील असून नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी निकालात त्यांनी 1054 गुणांसह देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर देशभरातील सोशल मीडियात त्यांच्याच नावाचा डंका आहे. सर्वत्र त्यांच्या यशाचं कौतूक केलं जात आहे. पण आता त्यांना वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Shubham Kumar
UPSC निकालात दरवर्षीच पडतेय मराठमोळे IPS महेश भागवतांची छाप!

माध्यमांशी बोलताना शुभम कुमार यांनी याबाबत खुलासा केला आहे. शुभम यांनी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे. त्यावर सुमारे साडे तीन हजार फॉलोवर्स आहेत. शुभम कुमार म्हणाले, माझ्या नावाने बनावट खाती उघडण्यात आली आहेत. त्यावर यापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मी फेसबूक किंवा यू-ट्यूबवर नाही. पण तिथे माझ्या नावाने बनावट पेज तयार करण्यात आली आहेत. काही जण स्वत:च प्रसिध्दी करत आहेत.

शुभम कुमार यांचे ट्विटरवर @SHUBHAMKR_IAS हे अकाऊंट आहे. इतर सर्व अकाऊंट बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत शुभम कुमार यांनी ट्विट करूनही माहिती दिली आहे. यावरील त्यांची पहिली पोस्ट हीच आहे. काही बनावट खात्यांवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आली आहेत. त्यामुळे शुभम कुमार यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, शुभम कुमार हे बिहारमधील कटिहार येथील राहणारे आहे. त्यांनी युपीएससीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आहे. शुभम अभियंते असून ते 2018 पासून या परीक्षेची तयारी करत होते. चोवीस वर्षीय शुभम यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आलं होतं. तर दुसऱ्या प्रयत्नात गुणवत्ता यादीत 290 क्रमांकावर आले. तिसऱ्या प्रयत्नात ते अव्वल ठरले. त्यांनी 2018 मध्ये मुंबईतील आयआयटीमधून स्थापत्य अभियंता ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर कुटूंबियांशी चर्चा करून युपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. अभियंत्याची पदवी मिळवून नोकरी न करता त्यांनी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com