मुख्यमंत्री चन्नींच्या मुलाच्या लग्नाला काँग्रेस लोटलं, पण सिद्धू अनुपस्थित!

नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Siddhu) हे मुख्यमंत्री चन्नी (CM Channi) यांच्यावर अद्याप नाराज असल्याची चर्चा
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मुलाचा विवाह सोहळा
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मुलाचा विवाह सोहळाTwitter

मोहाली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Punjab CM Charanjitsingh Channi) यांचा मोठा मुलगा नवजीतसिंग याचा विवाह रविवारी साध्या पद्धतीने पार पडला. मोहालीच्या गुरुद्वारा श्री साचा धनसाहिबमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

आपल्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी स्वत: गाडी चालवत गुरुद्वारा साहिबमध्ये दाखल झाले. सोबत कॅबिनेट मंत्री मनप्रीत बादल, पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत हे नेते पोहचले होते. या सोहळ्यासाठी काँग्रेसचे इतर मंत्री, खासदार, आमदार देखील उपस्थित होते.

मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अनुपस्थितीची. या अनुपस्थितीमुळे चन्नी आणि सिद्ध् यांच्यात अजूनही मतभेद असल्याच्या चर्चा चालू होत्या. पण या चर्चांवर स्वत: सिद्धू यांनीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. सिद्धू हे लखीमपुर खेरीहून परत घरी येण्याऐवजी रविवारी अचानक वैष्णव देवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. सिद्धू यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मुलाचा विवाह सोहळा
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मुलाचा विवाह सोहळाTwitter

सिद्धू ट्वीटमध्ये म्हणाले ``नवरात्री दरम्यान आदिशक्‍त‍ि आईचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलो आहे. वैष्णव देवीच्या पायाशी येवून धन्य झालो आहे.``

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मुलाचा विवाह सोहळा
नव्या चन्नी सरकारचा रिमोट सिद्धूंच्याच हातात असणार

दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी शिरोमणी अकाली दलाने सिद्धू यांच्यांवर टीका केली होती. सिद्धू यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा अजूनही असल्याचा आरोप अकाली दलाने केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com