भाजपचे 6 उमेदवार डेऱ्यात दाखल झाले अन् 24 तासांतच बाबा राम रहीम तुरुंगातून बाहेर

पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला आहे.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram Rahim Sarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियानातील भाजप (BJP) सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम रहीमला बाहेर काढण्यात आल्याचे भाजपने नाकारले आहे. मात्र, राम रहीमच्या सुटकेच्या 24 तास आधी भाजपचे सहा उमेदवार त्याच्या डेऱ्यात दाखल झाले होते, अशी माहिती समोर येत आहे.

राम रहीमच्या सुटकेच्या आधी एक दिवस पंजाबमधील भाजपचे सहा उमेदवार डेऱ्यात दाखल झाले होते. यानंतर 24 तासांतच राम रहीम हे तुरुंगातून बाहेर आले. हे उमेदवार आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, असे सांगण्यात येत आहे. राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढण्याची खेळी भाजपने खेळल्याच्या चर्चेला यामुळे बळ मिळत आहे. पंजाबमध्ये अनुसूचित जातींना समोर ठेवून मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना काँग्रेसने चेहरा बनवले आहे. याचवेळी राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी हे अनुसूचित जातींमधील आहेत. याआधी राम रहीमने अनेकवेळा निवडणुकांत महत्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेसची व्होटबँक असलेल्या हा मतदार राम रहीममुळे पक्षापासून दुरावला जाऊ शकतो.

राम रहीमचे पंजाबमध्ये माझा, माळवा आणि दोआबा या विभागात डेरे आहेत. तेथे त्याला मानणारा वर्ग अधिक आहे. याचबरोबर हरियानातील सिरसा जिल्ह्यात त्याचा प्रमुख डेरा आहे. माळवा विभागात राम रहीमची ताकद अधिक असून, तेथील तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पंजाबमधील 2007, 2012, 2017 मधील विधानसभा निवडणुकीत डेराने महत्वाची भूमिका बजावली होती. माजी मुख्यमंत्री अमरिदरसिंह हे सपत्नीक डेऱ्यात गेले होते. याचबरोबर बादल परिवारानेही डेऱ्यात हजेरी लावली होती. याचसोबत डेराने 2014 ची लोकसभा आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता.

Gurmeet Ram Rahim
काँग्रेसचा दे धक्का! 'या' राज्यात थेट भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. मागील दशकभरापासून राम रहीम हा तुरुंगात आहे. त्यामुळे तो आता तुरुंगातून बाहेर पडून थेट प्रचारात उडी घेण्याची शक्यता आहे.

Gurmeet Ram Rahim
मानेशिंदे म्हणाले, राणेंनी कोकण रेल्वेने प्रवास केला म्हणून रेल्वेगाडीची तपासणी करणार का?

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com