Nusrat Jahan ED News : ममता बॅनर्जींच्या निकटवर्तीय, 'टीएमसी'च्या खासदार नुसरत जहाँ अडचणीत...? 'हे' आहे कारण

West Bengal Politics : ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. 2017 मध्ये नुसरत जहाँ या कंपनीच्या संचालक होत्या.
ED Action Against TMC MP :
ED Action Against TMC MP :Sarkarnama

West Bengal Political News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय आणि बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने सहा तास चौकशी केली. ज्येष्ठ नागरिकांना फ्लॅटच्या विक्रीत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर ईडीने नुसरत जहाँ यांनाच चौकशीसाठी बोलवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट कंपनी सेव्हन सेन्सेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली चारशे लोकांकडून प्रत्येकी 5.5 लाख रुपये घेतले होते. मात्र, लोकांना ना त्यांचे फ्लॅट मिळाले ना त्यांचे पैसे परत मिळाले.

ED Action Against TMC MP :
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक : अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता

या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. 2017 मध्ये नुसरत जहाँ या कंपनीच्या संचालक होत्या. आता ईडी टीएमसी खासदाराची कंपनीतील भूमिकेबाबत चौकशी करत आहे. चौकशीच्या संपूर्ण प्रक्रियेची नोंद केली जाणार असून, नुसरत जहाँचा जबाबही नोंदवला जाणार आहे.

तर जनतेची फसवणूक करणाऱ्याला सोडले जाणार नाही. नुसरत यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर त्यांना शिक्षा होणारच, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सचिव अग्निमित्रा पॉल यांनी दिली आहे. हे मोदी सरकार आहे, मग तो मुख्यमंत्री असो की अभिनेता-अभिनेत्री. जर तुम्ही चूक केली असेल, जनतेची फसवणूक केली असेल तर तुम्हाला शिक्षा होणारच असा इशाराच पॉल यांनी दिला आहे.

पण नुसरत यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मे 2017 मध्ये एका रिअल इस्टेट कंपनीकडून आपण कर्ज घेतले होते आणि व्याजासह कर्जाची परतफेडही केली होती. तेव्हापासून आपला त्या कंपनीशी काहीही संबंध नाही, असा दावा नुसरत जहाँ यांनी केला आहे. तसेच कोणीही उठून कोणाच्याही विरोधात तक्रार करू शकतो, पण माझ्याविरोधात दिलेली तक्रार खरी आहे की खोटी, किमान याची सत्यता तरी तपासा, असंही त्यांनी म्हटलं आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नुसरतला पाठिंबा दिला आहे. तृणमूल काँग्रेसने केंद्रावर तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच टीएमसी नेत्यांना टार्गेट करून त्रास दिला जात असल्याचेही म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

ED Action Against TMC MP :
Mamata Banerjee On Elections : ममता बॅनर्जींचे 'ते' भाकित खरे ठरणार ; देशात डिसेंबरमध्येच निवडणुका होणार...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com