नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जी-२३ चे नेतृत्व करणारे गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी काँग्रेसने दिलेला प्रस्ताव नाकारला. युवा नेतृत्वासोबत काम करण्यास त्यांनी नकार दिला आहे. (Ghulam Nabi Azad latest news)
आझाद हे यापूर्वीच राज्यसभा निवडणुक रिंगणाच्या बाहेर आहेत. ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घरी बोलावलं होते. राज्यसभेत पाठविणे शक्य नसल्याचे सोनिया गांधी यांनी आझाद यांना सांगितले. त्यावर आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसमधील दुसऱ्यां क्रमांकाचे पद देण्याचा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याकडे ठेवला होता, पण हा प्रस्ताव आझाद यांनी नाकारल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबत आझाद म्हणाले, "राज्यसभेची निवडणूक लढविता येणार नाही हेच सांगायचे होते तर फोनवर सांगायला हवे होते, त्यासाठी घरी बोलावण्याची गरज काय,?"
गुलाम नबी आझाद आणि सोनिया गांधी यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी आझाद यांनी सोनिया गांधींना सांगितले की, आपल्या पक्षात युवा नेते आहेत. पण आपल्या आणि त्यांच्या विचारात फरक आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक नाही,
आझाद हे सध्या काँग्रेसच्या कार्यसमितीचे सदस्य आहेत. सोनिया गांधी यांना राजकीय सल्ला देणाऱ्या समितीचे ते सदस्य आहेत. गेल्या काही दिवसापासून ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.
काँग्रेस पक्षात असंतुष्ट लोकांचा एक गट (जी २३) आहे. कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील या असंतुष्ट गटाचे आधारस्तंभ होते. त्यांनी पक्षातील अनेक नाराज नेत्यांना एकत्र ठेवले होते. ते सतत या नेत्यांच्या संपर्कात असायचे. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भुपिंदर सिंह हुड्डा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे.
सिब्बल हे पक्षातील खटकणाऱ्या बाबींवर जाहीरपणे प्रश्न उपस्थित करत होते. पण, असे असले तरी सर्वोच्च न्यायालयात पक्षासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी ते कायम तयार असायचे. सिब्बल यांनी आता राजीनामा दिल्याने काँग्रेसला राजकीय धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.