आंनवी दिल्ली : आपण सर्वांंनी भाजप (BJP)/आरएसएसच्या (RSS) राक्षसी वृत्तीशी वैचारिकदृष्ट्या लढा द्यायला हवा. ही लढाई आपल्याला जिंकायची असेल, तर त्यासाठी आपण दृढनिश्चय करायला हवा आणि भाजपचा खोटेपणाचा देशातील जनतेसमोर आणायला हवा. ही मोहित समाजातील सर्व घटकांशी व्यापक चर्चा करुन घेतलेल्या ठोस धोरणांवर आणि कार्यक्रमांवर आधारित असावी, असे मत कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Soniya gandhi) यांनी व्यक्त केले आहे.
राज्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (ICCC मुख्यालय) मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत, काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी आणि पीसीसी अध्यक्षांसह राहुल गांधी, प्रियांका गांधी, अधीर रंजन चौधरी आणि नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी देशातील विविध घडामोंडीकडे लक्ष वेधले. सोनिया गांधी म्हणाल्या- आपला इतिहास साक्षीदार आहे की, एखाद्या संघटनेला अन्याय आणि विषमतेच्या विरोधात यशस्वी व्हायचे असेल, उपेक्षित लोकांच्या हक्कांसाठी लढायचे असेल तर, आपल्याला त्यांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे. या लढाईसाठी आपल्याला स्थानिक पातळीवर एक व्यापक आंदोलन उभे करायला हवे,
देशातील तरुण पिढी आपली स्वप्ने, इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी मोठ्या चळवळीची वाट पाहत आहेत. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे आपले कर्तव्य आहे. जसे आपण मागील पिढ्यांसाठी केले तसेच आता आपल्याला या नव्या पिढ्यांसाठी करायचे असल्याचेे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
देशातील सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास मोदी सरकार उत्तरदायी आहे. पण त्यांनी आपल्या संविधानाच्या मूलभूत मूल्यांना कमकुवत करण्यासाठी आमच्या संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपले शेतकरी आणि शेतमजूर, रोजगार आणि संधीसाठी लढणारे तरुण, छोटे आणि मध्यम उद्योग, विशेषत: या सरकारच्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या आपल्या वंचित बंधू-भगिनींसाठी आपण आपला लढा मजबूत केला पाहिजे, अशी ठाम भुमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान 16 ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये संघटनात्मक निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस १ नोव्हेंबरपासून सदस्यत्व मोहीम राबवणार आहे. हे पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यासोबतच पक्ष 29 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय स्तरावर महागाई विरोधात जनजागृती मोहीम राबवणार आहे. पुढील वर्षी यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी फक्त पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, पण तेथेही कमालीची अनास्था आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.