Goa Congress and AAP News : गोव्यात I.N.D.I.A आघाडीत फूट! 'AAP'च्या मतदारसंघात काँग्रेस देणार स्वतंत्र उमेदवार

Goa Congress Politics : 'आप'चे आमदार वेन्झी व्हिएगस यांच्या वक्तव्यास काँग्रेसकडून सावियो डिसिल्वा यांनी दिले प्रत्युत्तर
AAP Vs Congress
AAP Vs CongressSarkarnama
Published on
Updated on

Goa Election and Congress, AAP News : गोव्यात इंडिया आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी २०२७ मध्ये बाणावली मतदारसंघात काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार असेल आणि तो जिंकूनही येईल, असा दृढ आत्मविश्वास व्यक्त केला.

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस(Congress) दक्षिण आणि उत्तर गोवा या ठिकाणी जिल्हा पंचायतीच्या सर्व ५० जागा लढविणार असल्याचे शनिवारी (०७ डिसेंबर) त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या प्रदेश समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत गोव्यात काँग्रेसला पोषक असे निर्णय घेण्यात आल्याचे सावियो डिसिल्वा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

गोव्यात काँग्रेसची राज्य समिती आहे. त्याचबरोबर तीन आमदार आणि एक खासदारही आहे. त्यामुळेगोव्यात काँग्रेस संपली किंवा कॉंग्रेस गोव्यातून हद्दपार होईल, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बाणावलीत काँग्रेसला तब्बल १४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत १६ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे काँग्रेस बाणावलीत अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

AAP Vs Congress
Supriya Sule News : 'मुख्यमंत्री निवडीसाठी दोन आठवडे अन् अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार नाही, हे...' ; सुप्रिया सुळेंनी लगावला टोला!

'आप'(AAP)चे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी शुक्रवारी काँग्रेसने 'एकला चलो' धोरण अवलंबले तर काँग्रेस पक्ष गोव्यातून हद्दपार होईल, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सावियो डिसिल्वा यांनी पक्षाची बाजू मांडली.

AAP Vs Congress
PM Modi News : मोठी बातमी! मुंबई पोलिसांना आला थेट पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज

दिल्लीत सवता सुभा, मग गोव्यात युती का? -

आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबरची युती तोडली असून त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत गोव्यात त्यांना युती का हवी हा प्रश्न आहे, असे डिसिल्वा म्हणाले.

जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार ठेवला नाही; कारण केवळ दीड वर्षांची मुदत होती. मात्र, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुखावले गेले. गोव्यात युती पाहिजे की नाही, याचा लोक त्याचप्रमाणे पक्षाचे स्थानिक नेते निर्णय घेतील, असेही डिसिल्वा यांनी सांगून टाकले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com